आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आजाराने त्रस्त आहे नागार्जूनची होणारी सून, गेल्या वर्षीच झाला साखरपुडा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद - साऊथचे सुपरस्टार नागार्जूनचा मुलगा नागा चैतन्या आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभु यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समांथा-नागा 6 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. पण या दोघांच्या कुटुंबाकडून याविषयी कोणतीच माहिती मिळाली नाही. समांथा-नागाचा साखरपुडा डिसेंबर 2016 मध्ये झाला होता.
 
डायबेटीज पेशंट आहे समांथा..
समांथाला फिट बॉडी आणि हेल्दी लुक पाहून कोणालाच विश्वास बसणार नाही की तिला डायबिटीजसारखा गंभीर आजार असेल. 2013 मध्ये टेस्ट केल्यानंतर  ती डायबीटीज पेशंट असल्याचे तिला समजले. यामुळे समांथाने मणी रत्नम आणि इतर मोठ्या निर्मात्यांच्या ऑफर सोडल्या होत्या. आता समांथाला त्या आजारापासून खूप आराम मिळाला आहे. चित्रपट 'S/o Satyamurthy' मध्ये तिने डायबीटीक पेशंटची भूमिका केली होती. 
 
पार्ट टाईम जॉबपासून मॉडेलिंगपर्यंत..
सुरुवातीच्या काळात समांथाला पैशांची फार तंगी होती, त्यामुळे तिने लहानमोठे जॉब करण्यास सुरुवात केली. पार्ट टाईम जॉब करता करता समांथाने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. एकदा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर रवी वर्मन यांनी समांथाला पाहिले आणि तिला 'मास्कोविन कावेरी' या चित्रपटात घेतले. हाच तिचा डेब्यू चित्रपट होता. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, 'मनम' चित्रपटात केला होता नागार्जूनच्या आईचा रोल..
बातम्या आणखी आहेत...