मुंबई/हैदराबाद - साऊथचा सुपरस्टार नागार्जून आज 58 वर्षाचा झाला आहे. 29 ऑगस्ट 1959 रोजी जन्मलेल्या नागार्जूनने 1986 साली विक्रम चित्रपटातून डेब्यू केला होता. बॉलिवूडमध्ये त्यांनी 1990 साली आलेला चित्रपट 'शिवा' मध्ये सर्वप्रथम काम केले होते. जवळपास 90 हून जास्त चित्रपटांता काम केलेल्या नागार्जून यांनी दोन लग्न केले आहेत. त्यांचे पहिले लग्न 1984 साली लक्ष्मी दग्गुबतीसोबत झाले होते. लग्नाच्या जवळपास 6 वर्षांनी दोघांमध्ये घटस्फोट झाला. या अॅक्ट्रेसमुळे तुटले होते लग्न..
- मिळालेल्या माहितीनुसार, 80 आणि 90 च्या दशकात नागार्जून यांनी अँग्लो इंडियन अभिनेत्री अमाला मुखर्जीसोबत अनेक चित्रपटांत काम केले होते.
- असे म्हणतात की, सोबत काम करत असताना हे दोघे प्रेमात पडले आणि त्यांना एकमेकांवर प्रेम झाले. या प्रेमाबद्दल जेव्हा त्यांच्या पहिल्या पत्नीला कळाले तेव्हा प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले.
- यानंतर नागार्जून यांनी सर्वांसमोर अमालासोबतच्या असलेल्या प्रेमाची कबुली दिली आणि त्यांनी नंतर लग्न केले.
असे सुरु झाले होते अमाला-नागार्जून यांचे अफेअर..