आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भीगी बसंती\', \'टकिला शॉट\', अशी आहेत बॉलिवूडच्या प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसची नावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः चित्रपटसृष्टीत नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुरुवातीला केवळ चित्रपट आणि सिनेताऱ्यांच्या नावासाठी डोके खाजवावे लागत होते. मात्र, हा ट्रेंड आता चित्रपट निर्मिती कंपन्यांच्या नावांमध्येदेखील रुजू होत आहे.
साठ-सत्तरच्या दशकात प्रॉडक्शन हाऊसच्या नावांना त्याचे मालक कोण हे जाणून घेण्यामध्ये अधिक महत्त्व होते. मात्र, नंतर अनेक चित्रपट प्रॉडक्शन कंपन्यांची नावे एकसारखीच ठेवण्यात येऊ लागली. उदाहरणार्थ- जेव्हा राजकुमार हिरानींनी आपल्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव 'शंकर मूव्हीज' ठेवले त्या वेळी विमल कुमार यांनी आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या नावात बदल करून ते 'शिवम चित्र' ठेवले. यानंतर जितके हाऊस निर्माण झाले त्यांची धार्मिक नावे ठेवण्यात आली. मग ते धर्मा प्रॉडक्शन असो किंवा गीता आर्ट‌्स.
धार्मिक नावावरून या प्रॉडक्शननी प्रेक्षकांच्या मनात घर केले. मात्र, नंतरच्या काळात काही निर्मात्यांनी हाऊसच्या नावात वेगळेपणा आणला. मात्र, स‌ध्या प्रॉडक्शन हाऊसच्या नावाकडे नजर टाकली तर या नावामध्ये 'हटकेपणा' आणण्याबरोबरच ही नावे हास्यास्पद ठरत असल्याचे दिसते. यामुळे साहजिकच त्या त्या बॅनरची चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते.
बॉलिवूडमध्ये सध्या प्रॉडक्शन कंपन्यांची विचित्र नावे पाहायला मिळत आहेत. या नावामागे भलेही काही अर्थ दडला असला तरी त्या अर्थापेक्षा ही नावे अधिक हास्यास्पद ठरत आहेत.
एक नजर टाकुया बॉलिवूडच्या अशाच काही प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसच्या नावांवर...