आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरोबरोबर सेल्फी घेणे पडले महागात, साऊथच्या या स्टारने फॅनला लगावली थापड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद - साऊथ अॅक्टर नंदमुरी बालकृष्णाने नुकतेच सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या एका फॅनला थोबाडीत लगावल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी एका निवडणुकीच्या निमित्ताने तेलुगुदेशम पार्टी (टीडीपी) च्या प्रचारासाठी तो आंध्रप्रदेशच्या नांदयालमध्ये गेला होता. त्याचवेळी एक फॅन सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात त्याला धडकला. मग काय बालकृष्णाही काहीही विचार न करता त्याला एक थापड लगावली.  

व्हायरल झाला व्हिडिओ...
- ट्विटरवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात बालकृष्णा गर्दीमध्ये त्या फॅनला थापड मारताना दिसत आहे. 
- बालकृष्णाने यापूर्वी एका फॅनला थापड मारली होती. 2016 मध्ये तिरुमला मंदिरात सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तिला त्याने थापड मारली होती. 
- बालकृष्णाचा अपकमिंग तेलुगू चित्रपट 'पैसा वसूल' 1 सप्टेंबरला रिलीज होत आहे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अॅक्टर्सचे असेच फॅन, को अॅक्टर किंवा डायरेक्टरला थापड मारण्याची प्रकरणे..
 
 
बातम्या आणखी आहेत...