आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Finally! Nargis Fakhri Is Back To Mumbai; Spotted Hiding Her Face On Mumbai Airport

तोंड लपवत मुंबईत दाखल झाली नर्गिस फाखरी, हे सेलेब्सही दिसले एअरपोर्टवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नर्गिस फाखरी, श्रीदेवी - Divya Marathi
नर्गिस फाखरी, श्रीदेवी
मुंबईः दीर्घ सुटीनंतर अभिनेत्री नर्गिस फाखरी मुंबईत परतली आहे. शुक्रवारी एअरपोर्टवर ती या अंदाजात क्लिक झाली. मीडियाच्या कॅमे-यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी नर्गिसने ओढणीने आपला चेहरा लपवला होता. मात्र तिने असे का केले, हे कुणालाच कळले नाही.
ब्रेकअपनंतर गेली होती यूएसला...
नर्गिस फाखरी आणि उदय चोप्रा गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र याचवर्षी मे महिन्यात उदयने म्हणे नर्गिसला वॉट्सअॅपवर मेसेज टाकून ब्रेकअप केल्याचे सांगितले. यामुळे निराश झालेली नर्गिस यूएसला निघून गेली. हाऊसफूल 3चे प्रमोशन, आगामी बँजो या सिनेमाचे शूटिंग आणि इतर बॉलिवूड कमिटमेंट्स सोडून नर्गिस यूएसला रवाना झाली होती. तिने आता बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचीसुद्धा बातमी होती. मात्र सोशल मीडियावर तिने ही गोष्ट नाकारली होती. मात्र ग्रीसमध्ये मित्रांसोबत चांगला वेळ घालवून नर्गिस मुंबईत परतली आहे.

स्टनिंग लूकमध्ये दिसल्या माधुरी-श्रीदेवी
शुक्रवारी एअरपोर्टवर श्रीदेवी आणि माधुरी दीक्षितसुद्धा दिसल्या. दोघीही यावेळी स्टनिंग दिसल्या. याशिवाय हृतिक रोशन, पूजा हेगडे, युवराज सिंह, हेजल कीच, कायनात अरोरा आणि परेश रावलसुद्धा मुंबई विमानतळाबाहेर पडताना दिसले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, एअरपोर्टवर क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...