आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

36 वर्षांची झाली नर्गिस फाखरी, राणी मुखर्जीच्या दीरासोबत होते अफेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. 20 ऑक्टोबर 1979 रोजी क्वीन्स (न्युयॉर्क) मध्ये तिचा जन्म झाला. तिची आई मेरी चेक ख्रिश्चन तर वडील मोहम्मद फाखरी हे पाकिस्तानी आहेत. नर्गिस सात वर्षांची असताना तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता.
‘America's Next Top Model’चा भाग असलेल्या नर्गिसने 2011 मध्ये दिग्दर्शक इम्तियाज अलींच्या 'रॉकस्टार' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. त्यानंतर ती ‘मद्रास कैफे’, ‘मैं तैरा हीरो’, ‘फटा पोस्टर निकला हीरो’ आणि ‘किक’ या सिनेमांमध्ये झळकली आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या स्पाय या सिनेमाद्वारे तिने हॉलिवूडमध्ये डेब्यू केले.
आपल्या सिनेमांशिवाय नर्गिस यश चोप्रा यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिली आहे.
सध्या नर्गिस लंडनमध्ये असून आगामी 'अजहर' आणि 'हाऊसफूल 3' या सिनेमांचे शूटिंग करत आहे. या दोन सिनेमांशिवाय नर्गिस 'हेराफेरी 3' या सिनेमातही झळकणारेय.
इंस्टाग्रामवर आहेत 1 मिलिअन फॉलोअर्स
नर्सिग सोशल मीडियावर अॅक्टिव असून नित्यनेमाने इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःची छायाचित्रे अपलोड करत असते. इंस्टाग्रामवर तिचे जवळजवळ 1 मिलिअन फॉलोअर्स आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, नर्गिसची इंस्टाग्राम अकाउंटवरील खास छायाचित्रे...