आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nargis Fakhri Learning Marathi On The Set Of Ravi Jadhav\'s Film Banjo

Glamours नर्गिस फाखरी शिकतेय मराठी, कसं? जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी दिग्दर्शक रवी जाधव सध्या आपल्या बॉलीवूड भरारीच्या तयारीत आहे. ‘टाइमपास’, ‘बालक पालक’च्या यशानंतर आता तो आपली हिंदी फिल्म दिग्दर्शित करतोय. इरॉस इंटरनॅशनल निर्मित ह्या चित्रपटाचं नाव आहे, बँजो. महाराष्ट्रातल्या अस्तंगत चालत असलेल्या बँजो कलेविषयीचा हा चित्रपट आहे.
चित्रपटात रितेश देशमुख आणि नर्गिस फाखरी मुख्य भुमिकेत आहेत. रितेश बँजोवादकाची तर नर्गिस डिजेच्या भुमिकेत आहे. सध्या ह्या चित्रपटाचं शुटिंग सुरू आहे. विशेष म्हणजे एरवी हिंदी शब्दही महत्प्रयासाने व्यवस्थित बोलणारी नर्गिस फाखरी सध्या ह्या चित्रपटाच्या निमीत्ताने मराठी शिकतेय. ह्याचा अर्थ नर्गिसची चित्रपटात मराठी मुलीची भुमिका आहे, असा अर्थ काढू नका.
झालं असं की,रितेश देशमुख आणि रवी जाधवसह ह्या चित्रपटामध्ये काम करणारे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ मराठी आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या सेटवर अनेकदा मराठीत संभाषण होतं. त्यामुळे नर्गिसच्या कानावर आजकाल मराठी पडतंय. आणि आपोआपच तिची मराठी भाषेशी चांगली ओळख होऊ लागलीय.
सूत्रांच्या अनुसार, सध्या नर्गिस, हो, नाही, भात, भाजी सारखे सोप्पे मराठी शब्द बोलू लागलीय. चला म्हणजे सिनेमा संपेपर्यंत नर्गिस मराठी संस्कृती आणि भाषेशी चांगली परिचीत झाली. आणि तिने अवगतही केली तर, नर्गिसची मराठी सिनेमात एन्ट्री व्हायला हरकत नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नर्गिस फाखरी, रवी जाधव आणि बँजो वाजवणा-या रितेशचे फोटो