'पहिल्यांदा एनएसडीनंतर चित्रपटातील संघर्षाचा काळ... आणि जेव्हा यशस्वी झालो तेव्हाही आम्ही बरोबरच होतो. माहीत नव्हते तो असा सोडून जाईल. त्याची खूप-खूप आठवण येते' डोळ्याच्या कडा ओलावलेल्या नसिरुद्दीन शहा यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. मुंबईच्या बाहेर असल्याने त्यांना त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही. त्यांच्या आठवणीबाबत ते म्हणाले...
जेव्हा ओम पुरी म्हणाले - अबे साले...मैं हूं...
ओम आणि अमरीश पुरी यांच्यात खूप समानता होत्या. त्याचे चेहरेही जवळपास सारखेच होते. लोकांना ते भाऊ-भाऊच वाटायचे. त्याला अमरीश यांचा आवाजही काढता यायचा. फोनवर अनेकदा तो माझ्याशी त्यांच्या आवाजात बोलायचा. मीही अमरीश समजून बोलायचो. बराच वेळ बोलल्यावर तो म्हणायचा, 'अबे साले मै.... हूं।'
पुढे वाचा, नसीरुद्दीन शाह यांनी शेअर केलेले किस्से..