आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना, तब्बू, शबानासह या 10 कलाकारांना मिळाला आहे राष्ट्रीय पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' रिलीज झाला आहे. हा सिनेमा 2011मध्ये आलेल्या दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या सुपरहिट 'तनु वेड्स मनु' सिनेमाचा सिक्वेल आहे. कंगनाने पुन्हा एकदा आपल्या बळावर दमदार अभिनय दाखवला आहे. उत्कृष्ट अभिनय साकारलेल्या 'क्वीन' सिनेमासाठी कंगनाला अलीकडेच राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
कंगनाचा उत्कृष्ट अभिनय-
'तुन वेड्स मनु रिटर्न्स' सिनेमात कंगनाने उत्कृष्ट अभिनय केला आहे. कंगनाचे दत्तो आणि तनु हे दोनही पात्र प्रभावित करणारे आहेत. विशेषत: हरियाणवी एथलीटच्या भूमिकेत कंगनाने कमाल दाखवली आहे. मागील सिनेमात अनेक वाद आणि जुगाडानंतर तनु मनुची वधू होते. सिनेमाच्या सिक्वेलमध्ये लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांचे नाते वेगळ्या वळणावर जाते आणि दोघे काडीमोड घेण्याचा निर्णय घेतात. या विषयाला प्रेक्षकांसमोर उत्तमरित्या सादर केले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाला-
कंगनाच्या करिअरमध्ये 'क्वीन' सिनेमाने तिला अभिनयाची क्वीन बनवले. या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'क्वीन' सिनेमातून कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. या सिनेमापूर्वी तिने अनेक सिनेमांत काम केले, परंतु क्वीनने जे स्थान तिला मिळवून दिले ते इतर सिनेमांमुळे नाही मिळाले. कंगनाच्या पदार्पण 'गँगस्टर' सिनेमासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सेलेब्सविषयी...