आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाजुद्दीनने कधीच पत्नीला केले नाही KISS, जाणून घ्या लग्नापूर्वीच्या अफेअरविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाजुद्दीन सिद्दिकीने सांगितले लग्नाआदी किती अफेअर होते. - Divya Marathi
नवाजुद्दीन सिद्दिकीने सांगितले लग्नाआदी किती अफेअर होते.
लखनऊ: 10 जूनला नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'तीन' सिनेमा रिलीज झाला. नवाजुद्दीन 'बाबू मोशाय' या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी राजधानीत आला आहे. यावेळी त्याने divyamarathi.comच्या प्रतिनिधीसोबत गप्पा मारल्या. त्यादरम्यान त्याने खासगी आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले.
नवाजुद्दीनने जबरदस्ती पकडला होता शेजारणीचा हात...
- नवाजुद्दीन यूपीच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना गावातील रहिवासी आहे.
- लहान असताना त्याला शेजारच्या एका तरुणीवर प्रेम झाले.
- आपल्या पहिल्या प्रेमाविषयी नवाजुद्दीनने सांगितले, 'मी तेव्हा 17 वर्षांचा होतो. आमच्या गावात केवळ एकाच घरात टीव्ही होता. माझ्या शेजारी राहणारी तरुणी त्या घरात टीव्ही पाहण्यासाठी जात होती. मी तिच्या प्रेम करत होतो. म्हणून तिचा पाठलाग करू लागलो होतो. तिच्यामुळे मीसुध्दा टीव्ही पाहत होतो.'
- एकेदिवशी हिंमत करून मी तिचा हात पकडला. मी तिला म्हणालो, 'टीव्हीत काय आहे, मला बघ. ती हात झटकून म्हणाली, टीव्ही जास्त गरजेचा आहे.'
- मी तिला म्हणालो, एकेदिवशी मीसुध्दा टीव्हीवर येईल. तेव्हा तू मला बघ. आमचे इतकेच बोलणे झाले आणि माझ्या मनात काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली.
...वचन पूर्ण केले, पण मन तुटले...
नवाजुद्दीनने सांगितले, 'त्या तरुणीला दिलेले वचन नेहमी माझ्या मनात राहिले. परंतु कुटुंबाच्या दबावामुळे मी शिक्षण घेऊ लागलो.'
- 'मी हरिव्दारमधून B.Sc कॅमिस्ट्रीची पदवी घेतली आणि वडोदरामध्ये नोकरी करू लागलो. काही दिवसांत मी नोकरीला कंटाळलो.'
- 'मी नोकरीचा राजीनामा देऊन दिल्ला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे मी मित्रांसोबत मंडी हाऊसमध्ये नाटक पाहायला जायचो. माझ्या डोक्यात पुन्हा अभिनयाचा किडा वळवळू लागला होता. मी तिथेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.'
- नवाजुद्दीनने सांगितले, 'दिर्घकाळ संघर्ष केल्यानंतर मला 1999मध्ये आमिर खानच्या 'सरफरोश'मध्ये पहिला ब्रेक मिळाला. माझी केवळ 30 सेकंदाची भूमिका होती. परंतु गावात सांगण्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.'
- अभिनयात पदार्पण केल्यानंतर नवाजुद्दीनने गावातील मित्रांना फोन केला आणि सांगितले, की त्या मुलीला सांगा, मीसुध्दा टीव्हीवर दिसणार आहे.
- मित्रांनी सांगितले, की तिचे लग्न झालय. हे ऐकून नवाजुद्दीनने मन तुटले.
दिल्लीत खाल्ले बोलणे...
- नवाजुद्दीनने आणखी एक किस्सा ऐकवला. तो सांगतो 'मी दिल्लीत एनएसडीमध्ये शिकत होतो. तिथे सर्व बॅचमेट्सच्या गर्लफ्रेंड्स होत्या. माझी सोडून. मीसुध्दा एका मुलीसोबत मैत्री केली.'
- एकदा मी तिच्यासोबत गार्डनमध्ये फिरायला गेलो. तिथे मी तिचा हात पकडला. या कृत्यामुळे मी तिचे बोलणे खाल्ले होते. त्यानंतर माझे डोळे भरून आले.
- मला भावूक झालेले पाहून ती म्हणाली, कुणाला स्पर्श करण्यापूर्वी त्याची परवानगी घ्यावी. असे म्हणून तिने मला अलिंगन दिले.
सिनेमांत खात होतो मार, वडील रागवायचे...
- नवाजुद्दीनने सांगितले, 'सरफरोश'नंतर मला छोट्या मोठ्या भूमिका मिळण्यास सुरुवात झाली. माझ्या वडिलांची एकच तक्रार होती. मी प्रत्येक सिनेमांत मार खात होतो. ते मला नेहमी म्हणायचे, 'तू कधी तरी मारत जा. तुला असे मार खाताना पाहून मला त्रास होतो.'
- आता नवाजुद्दीनचा प्रयत्न असतो, की अशा भूमिका साकारयच्या जिथे इतरांना मारू शकेल.
लाजाळू नवाजुद्दीनने कधीच पत्नीला केले नाही KISS...
- नवाजुद्दीनने त्याच्या पर्सनल आयुष्याशी निगडीत एक गोष्ट शेअर केली.
- चर्चेत राहिलेल्या पहिल्या ऑनस्क्रिन किसविषयी त्याने सांगितले, 'मिस लव्हली शूटदरम्यान मला को-स्टार निहारिकाला लिप-लॉक करायचे होते. माझ्यासाठी तो सीन खूप कठिण होता. मी कधीच माझ्या पत्नीला असे किस केले नाहीये.'
- नवाजुद्दीनचे लग्न कमी वयातच झाले होते. तेव्हा तो सिनेसृष्टीत संघर्ष करत होता.
- त्याची पत्नी अंजली सिद्दीकी त्याच्याच गावातील आहे.
- अंजली आणि नवाजुद्दीनला एक मुलगी आणि मुलगा आहे.
- त्याचा मुलगा नवाजुद्दीनच्या 41व्या बर्थडेच्या दिवशी जन्माला आला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नवाजुद्दीनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...