आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसमुळे मोडला प्रभुदेवाचा संसार, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूडमध्ये जो त्याच्या डान्समुळे जाणला जातो तो प्रभूदेवा अनेकदा चर्चेत आला जेव्हा त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं. याच अभिनेत्रीमुळे प्रभूदेवाचा संसार मोडला असं बोललं जातंय. आम्ही बोलतोय ते दक्षिणेतील हॉट अभिनेत्री नयनताराविषयी. सिनेमांसोबतच  ती वादांमुळेही चर्चेत आली आहे.  गुजरातच्या जामनगर शहरात शिक्षण पूर्ण करणा-या नयनताराचे नाव दोन कारणांमुळे चर्चेत आले. पहिले कारण म्हणजे साऊथ सिनेमांचा सुपरस्टार आणि डान्सर प्रभु देवासोबतचे अफेअर आणि दुसरे म्हणजे ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्माचा स्वीकार केल्याने नयनतारा चर्चेत आली होती. 
 
प्रभूदेवासाठी हिंदू धर्माचा केला होता स्वीकार..  
रजनीकांत यांच्या ब्लॉकबस्टर ‘चंद्रमुखी’ या सिनेमातील नायिका नयनताराने प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. ख्रिश्चन असलेल्या नयनताराचा जन्म बंगळूरुच्या एका ख्रिश्चन कुटुंबात झाला.  तिचे खरे नाव ‘डायना मरियम कुरियन’ अशे असे आहे.  नयनताराचे वडील कुरियन कोदियात्तु एअरफोर्समध्ये होते तर आई ओमाना कुरियन हाउसवाइफ आहे. वडील एअरफोर्समध्ये असल्याने  चेन्नई, जामनगर, थिरुवला आणि दिल्लीत तिचे शिक्षण झाले. 
 
2008 मध्ये सुरु केले होते डेटिंग.. 
नयनताराने 2008 मध्ये अॅक्टर-डायरेक्टर प्रभुदेवाला डेट करणे सुरु केलं. 2010 मध्ये प्रभुदेवाची पत्नीने कोर्टात याचिका टाकली की प्रभुदेवा आणि नयनतारा लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. त्यानंतर पत्नी लताने धमकी दिली की जर नयनतारासोबत लग्न केलं तर ती उपोशनाला बसेल. त्यानंतर अनेक महिला संघटनांनी नयनतारावर तमिळ संस्कृती बदनाम करण्याचा आरोप लावला. 2011 मध्ये पत्नीसोबत प्रभुदेवाची फारकत झाली. 16 वर्षानंतर ते वेगळे झाले. पण 2012  मध्ये नयनताराने म्हटले, की आता तिने प्रभुदेवासोबत असलेले सगळे संबंध तोडून टाकले आहेत.
 
दिवाळखोर झाले होते प्रभुदेवा..  
प्रभुदेवाची फारकत झाल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होत चालली होती. पत्नीला 10 लाख रुपये आणि संपत्तीही द्यावी लागली होती. ज्याची एकुण किंमत 20-25 कोटी होती. सोबतच 2 कार आणि इतर काही गोष्टीही द्याव्या लागल्या. प्रभुदेवा आणि लताचा विवाह 1995 मध्ये झाला होता. प्रभुदेवाला 2 मुलं आहेत.

पुढे वाचा, शाहरुखच्या सिनेमात काम करण्यास नयनताराने दिला होता नकार...
बातम्या आणखी आहेत...