आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिंपल कपाडियावर होते ऋषी कपूर यांचे प्रेम, या भीतीने केले नाही प्रपोज..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री नीतू कपूर यांनी 8 जुलै रोजी त्यांचा 59 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. तसे पाहिले तर ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नाला 37 वर्ष झाले आहेत पण एक काळ असा होता की, नीतू आणि ऋषी यांचे अफेअर चर्चेचा विषय ठरले होते. ऋषी यांनी अभिनेता म्हणून बॉबी चित्रपटात प्रथम काम केले होते. या चित्रपटात ऋषी कपूर बॉबी म्हणजेच डिंपल कापडिया यांना पसंत करत होते. त्यांना डिंपल यांना प्रपोज करायचे होते पण वडील राज कपूर यांच्या नकाराने त्यांनी त्यांच्या भावना कधीच व्यक्त केल्या नाहीत. त्यानंतर त्यांच्या जीवनात नीतू कपूर आल्या आणि डिंपलला विसरत ऋषी कपूर यांचे अफेअर सुरु झाले. पण नीतू यांच्यासोबत लग्नानंतरही ऋषी कपूर अभिनेत्रींशी फ्लर्ट करण्याचा चान्स सोडत नसत. 
 
ऋषी यांच्या जीवनात जेव्हा नीतू सिंह आल्या त्याच्यानंतरही ऋषी कपूर इतर अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करत असत. पण नीतूअगोदरही अभिनेत्री यास्मिनसोबत त्यांचे 5 वर्ष अफेअर होते. नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर ऋषी यांना डिंपल कपाडिया आवडू लागल्या. असे म्हणतात, ऋषी कपूर फार कडक होते. ते नीतू सिंगला रात्री 8.30 नंतर शूटिंग करण्याची परवानगी देत नसत. नीतू यांना ऋषी कपूर यांच्या अफेअरबाबत माहिती होते. ते जेव्हाही पकडले जात तेव्हा साफ नकार देत असत. नीत म्हणाल्या, मी इतकी भोळी होती की त्यांची प्रत्येक गोष्ट मला खरी वाटत असे. ते मला डॉमिनेट करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असत. 

पुढच्या स्लाईडवर वाचा, ऋषी कपूर आणि नीतू यांच्याविषयी काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...