आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : बॉलिवूडमध्ये फ्लॉप असलेली नेहा फॅशन इंड्स्ट्रीत आहे हिट, पाहा Glamorous Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2004 मध्ये दीपक शिवदासानीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'जूली' हा सिनेमा रिलीज पूर्वीच चर्चेत होता. या सिनेमाने रात्रीतून नेहा धूपिया नावाच्या अभिनेत्रीला लोकप्रियता मिळवून दिली. सिनेमा इतका बोल्ड होता, की नेहा आणि सिनेमा दोघेही चर्चेत आले. त्यावेळी हिंदी सिनेसृष्टीत एवढा बोल्डनेस सामान्य नव्हता. आज हीच बॉलिवूड अभिनेत्री 37 वर्षांची झाली आहे.

27 ऑगस्ट 1980 रोजी नेहाचा कोच्ची, केरळमधील एका पंजाबी कुटुंबीत जन्म झाला. दिल्लीच्या आर्मी स्कुलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने जीजस अँड मेरी कॉलेज, नवी दिल्लीमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. 2002मध्ये नेहाने फेमिना मिस इंडियाचा खिताब आपल्या नावी केला.

नेहाकडे आज सिनेमे नाहीत मात्र, ती फॅशन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. नेहा तिच्या बोल्ड फोटोशूटने नेहमीच चर्चेत असते. 2012मध्ये तिने प्रतिष्ठित फॅशन मासिक FHMसाठी केलेल्या फोटोशूटमधून चांगलीच प्रसिध्दी मिळवली होती. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला नेहा धूपियाची काही निवडक छायाचित्रे दाखवणार आहोत, त्यामध्ये नेहाचा बोल्ड अंदाज तुम्ही पाहू शकता.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा नेहा धूपियाच्या फोटोशूटमधून घेण्यात आलेली काही निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...