आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी भजन गायची ही तरुणी, आज आहे बॉलिवूडची प्रसिध्द गायिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहा एका लग्नासाठी उदयपुरला पोहोचीली होती. - Divya Marathi
नेहा एका लग्नासाठी उदयपुरला पोहोचीली होती.
उदयपुर (राजस्थान): बॉलिवूड गायिका नेहा कक्करने स्वत:च्या मधूर आवाजातून ओळख निर्माण केली आहे. कधीकाळी ही गायिका देवीच्या जागरणात भजन गात होती. नेहा शनिवारी (24 एप्रिल) उदयपूरला एका लग्नसोहळ्यात आली होती. divyamarathi.com तुम्हाला आजा सांगणार आहे, एका छोट्याशा शहरातून आलेली तरुणी कशी झाली बॉलिवूड गायिका...
कुठली आहे नेहा?
- नेहाचा जन्म उत्तराखंडच्या ऋषीकेशमध्ये 6 जून 1988ला झाला.
- तिच्या आईचे नाव निती आणि वडिलांचे नाव ऋषीकेश कक्कर आहे.
- नेहा वयाच्या चौथ्या वर्षी गायनाला सुरुवात केली.
- ती थोरली बहीण सोनू कक्करसोबत जागरण आणि माताच्या चौकीमध्ये गाणे गायची.
- त्यानंतर ती बहीण आणि कुटुंबीयांसोबत दिल्लीला आली.
- येथील न्यू होली पब्लिक स्कूलमधून तिने शालेय शिक्षण घेतले.
- शाळेत शिक्षण घेत असताना तिने इंडियन आयडलमध्ये सहभाग घेतला.
- ती जेव्हा या शोमध्ये आली तेव्हा तिचे वय केवळ 18 वर्षे होते.
बनवला स्वत:चा अल्बम...
- नेहाचे पहिले हिट गाणे 'सेकंड हँड जवानी' (कॉकटेल) आहे. ती 'यारिया' सिनेमातील 'सनी सनी' गाण्यातून लोकप्रिय झाली.
- भजन गाणारी नेहा इंडियन आयडलच्या फायनलपर्यंत पोहोचली होती. मात्र, ती किताब जिंकू शकली नव्हती.
- त्यानंतर नेहाने 2008मध्ये स्वत:चा अल्बम लाँच केला.
भाऊ-बहीण दोघे बॉलिवूडमध्ये...
- नेहाची बहीणसुध्दा बॉलिवूड गायिका आहे. तिने 'बापूजी जरा धीरे चलो'सारखी गाणी गायली आहेत.
- स्टार बनल्यानंतरसुध्दा सोनू आणि नेहा भजन गातात.
- नेहाचा भाऊ टोनी कक्करसुध्दा म्यूझिक कम्पोजर आहे. त्या आतापर्यंत बॉलिवूड आणि नेहासाठी अनेक गाणी कम्पोजर केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नेहा कक्करचे निवडल ग्लॅमरस PHOTOS...