आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजा-यांना मिळाले \'विरुष्का\'च्या लग्नाचे निमंत्रण, अनुष्का मीडियाला म्हणाली Thank You..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत इटलीत विवाह करत असल्याची बातमी आहे. विराट दिल्लीहून तर अनुष्का मुंबईहून कुटुंबीयांसोबत इटलीला रवाना झाली आहे, विशेष म्हणजे आध्यात्मिक गुरु अनंत बाबासुद्धा  अनुष्काच्या कुटुंबियांसोबत परदेशी रवाना झाले आहेत. त्यांची उपस्थिती पाहता आता ‘विरुष्का’चे शुभमंगल जवळपास नक्कीच असल्याची अनेकांना खात्री होऊ लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  येत्या 9 ते 12 डिसेंबर याकाळात हे लग्न होणार आहे. 


अनुष्काच्या वडिलांनी दिले शेजा-यांना लग्नाचे निमंत्रण
- एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, वर्सोवाच्या बदरीनाथ टॉवरमध्ये वास्तव्याला असलेले अनुष्काचे वडील अजय कुमार शर्मा यांनी त्यांच्या शेजा-यांना अनुष्काच्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे.
- या बिल्डिंगमधील त्यांच्या निवडक शेजा-यांना त्यांनी लग्नात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, हे शेजारी इटलीत जाऊ शकणार नाहीत, पण त्यांनी अनुष्काच्या वडिलांना मुलीच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या असून लग्नाचे अपडेट देत राहण्याची विनंती केली. 
- इतकेच नाही तर अजय कुमार शर्मा यांनी शेजा-यांना लग्नाची बातमी मीडियासोबत शेअर न करण्याची विनंती केली आहे.  

 

पुढे वाचा, इटलीला रवाना होण्यापूर्वी एअरपोर्टवर मीडियाला काय म्हणाली अनुष्का... 

बातम्या आणखी आहेत...