आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video+Photos : नील-रुक्मिणीचे झाले ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन, डोळे दिपवणारा होता विवाहसोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः उदयपूरमध्ये शाही विवाहसोहळ्यानंतर नील नितिन मुकेशची 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत  ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी झाली. नील आणि त्याची पत्नी रुक्मिणी सहाय यांनी पाहुण्यांसाठी  इंट्रेस्टिंग डिस्पले आणि मेन्यू  सरप्राइज ठेवले होते.  या ग्रॅण्ड पार्टीची थीम युरोपियन स्टाइल बेस्ड होती. येथे व्हाइट आणि पिंक कलरच्या फुलांची सजावट करण्यात आली होती. हे रिसेप्शन मुंबईतील जुहूच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्ही नील आणि रुक्मिणी या हॉटेलमध्ये डेकोरेशन सुपरवाइज करायला पोहोचले तेव्हा तिथे अमिताभ बच्चन यांना बघताच त्यांचा आशीर्वाद घ्यायला पोहोचले होते. या रिसेप्शनला अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय बिपाशा बसु, करण सिंह ग्रोवर, कतरिना कैफ यांचीही उपस्थिती असण्याची शक्यता आहे. सेलिब्रिटींसाठी रिसेप्शनमध्ये वेगवेगळ्या अरेंजमेंट करण्यात आल्या आहोत. तरुणांसाठी हॉटेलमध्ये नाइट क्लब रिजर्व करण्यात आले आहे. रिसेप्शनला नील आणि त्याची पत्नी डिझायनर मानव गंगवानी यांनी डिझाइन केलेले एमेराल्ड ग्रीन कलरचे आउटफिट परिधान करणार आहेत. 

जयपूरमध्ये रंगला शाही विवाहसोहळा... 
बुधवारी 8 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये नील आणि रुक्मिणीची संगीत आणि मेंदी सेरेमनी झाली. त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी हळदी आणि सप्तपदी झाल्या. या लग्नात 500 गेस्ट सहभागी झाले होते. नीलच्या या ग्रॅण्ड लग्नात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी झाली होती. शिवाय लग्नाची वरात खास विंटेज गाड्यांमधून लग्नमंडपात पोहोचली.  

नील-रुक्मिणीचे अरेंज मॅरेज
34 वर्षीय नील आणि 27 वर्षीय रुक्मिणी यांचे अरेंज मॅरेज असून दोन्ही कुटुंबिय एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. गेल्यावर्षी दस-याच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या साखरपुड्याला नील व रुक्मिणीचे कुटुंबीय आणि खास मित्रपरिवार उपस्थित होता. 

कोण आहे रुक्मिणी सहाय...
रुक्मिणी नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून आहे. तिचे शिक्षण मुंबईतील लीलावती बाई पोदार हायस्कूलमधून झाले आहे. सध्या ती ACASS रिक्रूटमेंट कंपनीत काम करते.

या फिल्म्समध्ये दिसला नील...
'जॉनी गद्दार', 'न्यूयॉर्क', 'सात खून माफ', 'वझीर', 'प्रेम रतन धन पायो' यांसह अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, नील-रुक्मिणीच्या शाही विवाहसोहळ्याची खास झलक व्हिडिओ आणि फोटोजमध्ये...

फोटो आणि व्हिडिओ सौजन्यः द वेडिंग स्टोरी 
 
बातम्या आणखी आहेत...