आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या कपल्सनी सजणार बॉलिवूडचे आगामी सिनेमे, जाणून घ्या या जोड्यांविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक आनंद राय यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये विद्या बालन आणि दक्षिणेकडील नायक धनुष हे सोबत काम करणार नाही. बॉलिवूडमधील अन्य चित्रपटात मात्र आघाडीचे अॅक्टर्स प्रथमच सोबत काम करणार आहेत. यात दीपिका-अनिल कपूर, कंगना-शाहिद-सैफ आणि नवाजुद्दीन-अमिताभ बच्चन या जोड्यांचा समावेश आहे.
अमिताभ बच्चन आणि इरफान खान सोबत 'पीकू'मध्ये उत्कृष्ट अभिनय केलेली दीपिका आता पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का देणार आहे. दीपिका श्रीराम राघवन यांच्या एका चित्रपटात अनिल कपूर यांच्यासोबत दिसणार असल्याचे समजते.
विकास स्वरूप यांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये काम करण्यास दीपिकाने काही दिवसांपूर्वी होकार दिला होता. कथितरीत्या राघवन यांनी अनिल कपूर यांच्याशी या चित्रपटाबाबत अलीकडेच चर्चा केली असून त्यांनी देखील होकार कळवला आहे. अनिल यापूर्वी विकास यांच्याच पुस्तकावर आधारित बनलेल्या 'स्लमडॉग मिलियनेयर'मध्ये दिसले होते.
'बाजीराव मस्तानी'चे शूटिंग पूर्ण होताच दीपिका या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करू शकते. दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दिकीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची आपली इच्छा असल्याचे म्हटले होते. सुजॉय घोष यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे नाव 'केरला' असल्याचे समजते. या चित्रपटाची शूटिंग केरळमध्येच होणार आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होऊ शकते.
अशाच प्रकारे कंगना रनोट विशाल भारद्वाजच्या 'रंगून'मध्ये प्रथमच शाहिद कपूर आणि सैफ अली खानसोबत काम करणार आहे. 'कट्टी बट्टी'मध्ये देखील ती इम्रान खानसोबत प्रथमच दिसणार आहे, तर आमिर खानच्या 'दंगल'मध्ये आमिर खानच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये पंजाबी अॅक्ट्रेस दिसणार आहे. या भूमिकेसाठी मल्लिका शेरावतने काही दिवसापूसर्वी ऑडिशन दिले मात्र तिला नाकारण्यात आले.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी काही जोड्यांविषयी...