आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Pics Of Bollywood Actress Asin And Rahul Sharma\'s Grand Wedding

असिनच्या लग्नाला बी टाऊनमधून एकमेव अक्षयची हजेरी, असे झाले ख्रिश्चन पद्धतीने Wedding

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सर्वेसर्वा राहुल शर्मा 19 जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले. नवी दिल्लीतील एका चर्चमध्ये सकाळी साडे अकराच्या सुमारास दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. जवळपास शंभर पाहुणे असिन-राहुलच्या या खास क्षणांचे साक्षीदार झाले. त्यानंतर नवी दिल्लीतील दुसित देवराना रिसॉर्टमध्ये हिंदू पद्धतीने संध्याकाळी लग्न पार पडले. लग्नात संपूर्णपणे शाकाहारी मेन्यू ठेवण्यात आला होता. यावेळी दहा थरांचा व्हॅनिला केकही नवदाम्पत्यासाठी मागवण्यात आला होता. दिल्लीतील विवाहसोहळा फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईकांसाठी होता. मात्र 23 जानेवारी रोजी मुंबईत बॉलिवूडमधील तारेतारकांसाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. या लग्नात बॉलिवूडमधून एकमेव अक्षय कुमारची उपस्थिती होती. (हिंदू पद्धतीने पार पडलेल्या असिन-राहुलच्या लग्नाची खास झलक बघा येथे..)
असिनच्या हिंदू पद्धतीच्या लग्नाची साडी ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्ससाची यांनी तयार केली तर ख्रिश्चन पद्धतीचा गाऊन वेरा वॅन्ग यांनी डिझाईन केला होता. राहुलने असिनला तब्बल सहा कोटी रुपयांची डायमंड रिंग देत प्रपोज केले होते.
ख्रिश्नच आणि हिंदू पद्धतीने पार पडलेल्या लग्नात असिन अतिशय सुंदर दिसली. तिच्या ख्रिश्चन पद्धतीने पार पडलेल्या लग्नाची खास छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहा कसा रंगला असिन-राहुलचा ख्रिश्चन पद्धतीने लग्नसोहळा...