एंटरटेनमेंट डेस्क - अक्सर 2 हा चित्रपट रिलीजसाठी तयार आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्यांची सध्या धूम पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे तिसरे गाणे तनहाईयाँ नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यातही झरीन खान हिचा भलताच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. यापूर्वी याच चित्रपटातील, 'आज जिद' आणि जाना वे ही गाणी रिलीज झाली आहेत. या गाण्यांमध्येही झरीनचा बोल्ड लूक पाहायला मिळाला आहे. गाणे आणि ट्रेलरमधून झरीनच्या बोल्डनेसची झलक तर दिसतच आहे. त्यामुळे आता चित्रपटात बोल्डनेसचा किती तडका पाहायला मिळणार अशा चर्चा या चित्रपटाबाबत सुरू आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अक्सर 2 च्या नव्या गाण्यातील स्क्रीन शॉट्स..