आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-अनुष्का, करीना-अर्जुन, अक्षय-निरमतसह स्क्रिनवर दिसणार या 11 नवीन जोड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः आगामी 'सुलतान' या सिनेमात अभिनेत्री अनुष्का शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या सिनेमात ती अभिनेता सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सलमान-अनुष्का ही जोडी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. यापूर्वी अनुष्काने शाहरुख खान आणि आमिर खान या खान मंडळींसोबत स्क्रिन स्पेस शेअर केली होती. मात्र सुलतानच्या निमित्ताने पहिल्यांदाच ती सलमान खानसोबत झळकणार आहे. सलमान आणि अनुष्काप्रमाणेच यावर्षी अनेक नव्या जोड्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणारेय.
'की अँड का'मध्ये अर्जुन कपूर आणि करीना कपूरची जोडी

अर्जुन कपूर आणि करीना कपूर खान स्टारर 'की अँड का'चा फस्ट लूकसुद्धा अलीकडेच रिलीज झाला. दिग्दर्शक आर. बाल्कींच्या या सिनेमात हे दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
या आहेत ऑनस्क्रिनच्या नव्या जोड्या...

यावर्षी रिलीज होणा-या 'एअरलिफ्ट', 'रईस', 'फितूर', 'ढिशूम', 'बागी', 'फॅन'सह अनेक सिनेमांमध्ये नवीन स्टार कपल्स रोमान्स करताना दिसणार आहेत. शाहरुख खान-माहिरा खान, आदित्य रॉय कपूर-कतरिना कैफ, अक्षय कुमार-निरमत कौर, जॉन अब्राहम-जॅकलिन फर्नांडिससह अनेक नवीन जोड्या सिल्व्हर स्क्रिनवर दिसणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा , सिल्व्हर स्क्रिनवर अवतरणा-या नवीन जोड्यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...