आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP महिला नेत्याची मुलगी आहे ही अभिनेत्री, राहुलच्या स्वयंवरमध्ये झळकली होती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकुंज मलिक - Divya Marathi
निकुंज मलिक
जयपूर- चार दिवस जयपूर चाललेला प्रो कबड्डी सामाना संपला आहे. सर्व टीम दिल्लीला पोहोचली आहे. यांच्यासोबत शोची अँकर निकुंज मलिकसुध्दा पिंक सिटीमध्ये पोहोचली होती. जाण्यापूर्वी तिने टि्वटर अकाऊंटवर येथील एक फोटो शेअर केला आहे. निकुंज यापूर्वी राहूल महाजनच्या स्वयंवरमध्ये दिसली होती.
कोण आहे निकुंज मलिक...
- निकुंज भाजपच्या नॅशनल एग्जिक्यूटीव्ह शुभलाता मलिक यांची मुलगी आहे.
- शुभलाता भाजपकडून दिल्लीच्या झोपडपट्टी परिसराच्या विकासाच्या अध्यक्षा होत्या.
- निकुंजचा जन्मा गुडगावमध्ये झाला.
- तिने फुटविअर आणि एक्सेसरीज डिझाइनिंगमधून एनआयएफटीमध्ये पदवी शिक्षण घेतले आहे.
- त्यानंतर तिने मास्टर डिग्रीसुध्दा या संस्थेतून घेतली.
- नंतर निकुंज पीएचडी करण्यासाठी आयआयएम जॉइन केले. परंतु घरच्यांच्या विरोधामुळे ती पुढील शिक्षण पूर्ण करू शकली नाही.
- घरातील विरोध इतका वाढला, की वडीलसुध्दा निकुंजच्या विरोधात गेले आणि तिची साथ सोडली.
का निकुंजला घरच्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला...
निकुंज टेलिव्हिजनवर राहूल महाजनच्या स्वयंवरची फायनालिस्ट होती. तिने एका मुलाखतीत सांगितले होते, की शोदरम्यान निकुंज मालिकला तिच्याच चुलत भावांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. निकुंजचे वडिलसुध्दा तिच्या विरोधात गेले. मीडियामध्ये चर्चा झाल्यानंतर ही माहिती समोर आली होती. निकुंजने सांगितले होते, की तिचे कुटुंबीय तिचे लग्न करू इच्छित होते. परंतु तिला पुढे शिकायचे होते. निकुंजने काका महावीर प्रसादवर मारहाण आणि त्यांचा मुलगा अमितवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप लावला होता. याची
तक्रार फरीदाबाद ठाण्यात दाखल केली होती.
हे प्रकरण येथेच थांबले नाही. ठाण्यातील लोकही तिला समजावून सांगू लागले होते. सिनेमा मिळाल्यानंतर घरच्यांचा विरोध आणखी वाढला होता. निकुंजच्या आईला मारहाणसुध्दा केली. त्यामुळे त्यांना खासगी सेक्युरिटी गार्डसुध्दा हायर करावे लागले.
कोणत्या सिनेमांत केले आहे काम...
निकुंज 'रिव्हॉल्वर रानी' आणि 'शौकीन'सारख्या सिनेमांत काम केले. सोबतच तीन अनेक टीव्ही मालिकांमध्येसुध्दा दिसली आहे. ती अनिल कपूर यांच्या '24' शोमध्ये सिमरनच्या भूमिकेत होती. शिवाय, ती 'सिंहासन बत्तीसी' आणि 'अदालत'सारख्या टीव्ही शोमध्ये झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निकुंजचे ग्लॅमरस फोटो...