आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitara Practicing Yoga With Mother Twinkle Khanna

अक्षय कुमारची चिमुकली गिरवतेय योगाचे धडे, ट्विंकलने शेअर केला PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आई ट्विंकल खन्नासोबत नितारा कुमार)
मुंबईः अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची लाडकी लेक नितारा सध्या योगाचे धडे गिरवतेय. होय, अलीकडेच ट्विंकल खन्नाने तिची क्युट मुलगी निताराचे एक छायाचित्र सोशल साइटवर अपलोड केले आहे. ट्विटरवर अपलोड केलेल्या या फोटोविषयी ट्विंकलने मिश्किलपणे म्हटले, की नितारा आता बाबा रामदेव यांना कॉम्पिटिशन देणार आहे.
फोटो शेअर करताना ट्विंकलने ट्विट केले, "Baba Ramdev you have some tough competition coming your way as Baby Nitara learns all the moves #YogaFilledLife"
या फोटोत नितारा आपल्या आईकडून योगा शिकताना दिसतेय. या फोटोत दोघींचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. नितारा ही अक्षय-ट्विंकलची धाकटी मुलगी असून तिचा जन्म 25 डिसेंबर 2012 रोजी झाला. नितारा आता अडीच वर्षांची झाली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा निताराची आणखी काही खास छायाचित्रे...