आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... आणि ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, 'मी सेक्स करु शकत नाही'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री स्वरा भास्कर)

नवी दिल्लीः हिंदी सिनेसृष्टीत स्थिरस्थावर होण्यासाठी अनेक अभिनेत्रींना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या बातम्या अधूनमधून कानावर पडत असतात. बॉलिवूडमध्ये संधीच्या शोधात असलेल्या या नवोदित अभिनेत्री अनेकदा कास्टिंग काऊचसारखे खुलासे करतात. आता अभिनेत्री स्वरा भास्करनेसुद्धा तिच्यासोबत कास्टिंग काउचचा प्रकार झाल्याचे उघड केले. मात्र त्यावेळी ती तो प्रकार समजू शकली नव्हती. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत स्वराने ही गोष्ट उघड केली. मुलाखतीत स्वराने सांगितले, अनेकदा लोक इशा-यात विचारायचे की तू आणखी काय करु शकते? त्यावेळी स्वरा त्यांना तिच्या अभिनयातील बारकावे सांगायची. मात्र त्यामुळे तिची निवड व्हायची नाही.
स्वराने या मुलाखतीत एक किस्सा सांगितला, "एका व्यक्तीने मला वारंवार विचारले, की तू आणखी काय करु शकते. मी एक-एक करुन सर्व उत्तरे दिली. जेव्हा सर्व उत्तरे देऊन झाली, तेव्हा माझ्या लक्षात आले, की 'अरे ही व्यक्ती दुसरेच काही' विचारतेय, तेव्हा मी स्पष्ट उत्तर दिले, की 'सेक्स' करु शकत नाही. ती मीटिंग तिथेच संपली आणि ती व्यक्ती तिथून निघून गेली."
स्वराने स्वीकारले, की इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी ओळख असणे गरजेचे आहे. मात्र यश मिळवण्यासाठी तुमच्या क्षमता असणेही गरजेचे आहे.
पुढे वाचा, कोण आहे स्वरा..