आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Wedding Plans Of Katrina Kaif With Ranbir Kapoor

रणबीरसोबत इतक्यात लग्न करणार नाही कतरिना, शक्यता फेटाळल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रणबीर कपूरसोबत कतरिना कैफ)
मुंबईः बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे दिसून येत आहे. कारण कतरिना कैफच्या पीएने अलीकडेच तिच्या लग्नाच्या बातम्यांविषयी स्पष्टीकरण दिले आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, कतरिनाच्या लग्नासंदर्भात सध्या ज्या बातम्या येत आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाहीये. त्याने सांगितले, "कतरिनाची लग्नाची बातमी केवळ अफवा आहे. दोन्ही स्टार्सनी अद्याप लग्नाचे कोणतेही प्लानिंग केलेले नाही."
खरं तर रणबीरने एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीनंतरच त्यांच्या लग्नाच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या होत्या. रणबीरने मुलाखतीत म्हटले होते, की "यावर्षी आम्ही दोघेही खूप बिझी आहोत. त्यामुळे सध्या तरी आमच्याकडे लग्नासाठी वेळ नाहीये. मात्र पुढच्या वर्षीच्या शेवटी आम्ही दोघांनी लग्नाचा विचार केला आहे."
'अजब प्रेम की गजब कहानी' आणि 'राजनिती' या हिट सिनेमांमध्ये एकत्र झळकलेले रणबीर आणि कतरिना गेल्या काही दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. दिग्दर्शक अनुराग बसूच्या 'जग्गा जासूस' या सिनेमामध्ये ही जोडी एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.