कलर्स टीव्हीवरील 'बिग बॉस' आणि 'झलक दिखला जा' या दोन रिअॅलिटी शोजमध्ये आपला जलवा दाखणारी अभिनेत्री नोरा फतेही सध्या इंटरनेटवर बरीच लोकप्रिय झाली आहे. तिच्या या लोकप्रियतेमागचे कारण आहे तिने किंगफिशर कॅलेंडरसाठी केलेले फोटोशूट. सध्या तिचे हे फोटोशूट इंटरनेटवर खूप पसंत केले जात आहे.
बिकनीत नोराचा सुपरहॉट अंदाज लक्ष वेधून घेतोय. फोटोग्राफर अतुल कसबेकरने क्लिक केलेल्या या फोटोजमध्ये नूरा अतिशय सुंदर दिसत आहे.
नोरा झलक दिखला जाच्या नवव्या पर्वात झळकली आहे. इतकेच नाही तर 'रॉकी हँडसम' आणि 'मिस्टर एक्स' या बॉलिवूड सिनेमांमध्येही नोराचे दर्शन घडले आहे. याशिवाय तिने तेलगु आणि मल्याळम सिनेमांमध्येही काम केले आहे. 650 कोटींची कमाई करणा-या सुपरहिट 'बाहूबली' या सिनेमातील 'मनोहारी' या गाण्यात तिचा स्पेशल अपिअरन्स बघायला मिळाला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, नूराने किंगफिशर कॅलेंडरसाठी केलेल्या फोटोशूटची खास झलक...