आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Young Anushka Sharma, But Suzy To Play Salman’S Daughter In 'Sultan'!

सुरुवातीला गाळले सलमानसाठी अश्रू, आता 'सुल्तान'मध्ये दिसणार त्याच्या मुलीच्या भूमिकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानसोबत सुजी खान - Divya Marathi
सलमान खानसोबत सुजी खान

मुंबईः अभिनेता सलमान खानच्या आगामी 'सुल्तान' या सिनेमात दुबई राहणारी बालकलाकार सुजी खान त्याच्या मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती, की या सिनेमात सुजी, अनुष्काचे बालपणीचे कॅरेक्टर रंगवेल. मात्र एका वेबसाइटने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, सुजी सलमानच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. आठवीत शिकणा-या या मुलाने केलंय सलमानसोबत काम, कुस्तीत आहे चॅम्पिअन
एकेकाळी सलमानसाठी सुजीने गाळले होते अश्रू...
गेल्यावर्षी सलमानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाच्या रिलीजच्या काळातच सुजीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत सुजी 'बजरंगी भाईजान'चा शेवट बघून रडताना दिसली होती. हा व्हिडिओ बघून स्वतः सलमान इमोशनल झाला होता. हा व्हडिओ सलमानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरदेखील शेअर केला होता. इतकेच नाही तर त्याने सुजीची भेटदेखील घेतली होती. 'सुल्तान'चा TEASER OUT, कुस्ती खेळताना दिसला सलमान खान
'सुल्तान'साठी सलमानची पसंती होती सुजीला...
सहा वर्षीय सुजैन अहमद खान उर्फ सुजी 'सुल्तान'साठी सलमानची पसंत आहे. रिपोर्ट्सनुसार, एका सुपरस्टारची मुलगी ही भूमिका साकारण्यासाठी तयार होती. मात्र सलमानने तिची निवड न करता आपल्या मुलीच्या भूमिकेत सुजीची निवड केली. 'सुल्तान' या सिनेमात सलमान पहिलवान साकारताना दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या सिनेमात अनुष्का शर्मासुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल. अलीकडेच या सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सुजी खानची सलमान आणि इतर आणखी काही स्टार्ससोबतची खास छायाचित्रे...