आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! 8 वर्षांत इतकी बदलली \'चक दे इंडिया\'ची कोमल चौटाला, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: चित्राशी रावत
मुंबई- 2007मध्ये आलेल्या सुपरहिट 'चक दे इंडिया' सिनेमा सर्वांच्या स्मरणात असेल. सिनेमात शाहरुख खान हॉकीचा प्रशिक्षक बनला होता. त्याच्या टीममध्ये सर्वात कमी वयाची खेळाडू होती कोमल चौटाला. सिनेमात कोमलची भूमिका साकारणा-या अभिनेत्रीचे खरे नाव चित्राशी रावत आहे. चित्राशीने कोमल पात्र उत्कृष्टरित्या वठवले होते. 29 नोव्हेंबर 1989मध्ये उत्तराखंडमध्ये जन्मलेली चित्राशा ख-या आयुष्यातसुध्दा हॉकी खेळाडू होती. ती राष्ट्रीय पातळीवर हॉकी स्पर्धेत उत्तराखंडचे प्रतिनिधीत्व करत होती.
'चक दे इंडिया'नंतर 'लक' (2009), 'ये दूरिया' (2011), 'तेरे नाल लव्ह हो गया' (2012) आणि 'ब्लॅक होम' (2015)सारख्या सिनेमांत दिसली. तसेच तिने टीव्ही शो 'कॉमेडी सर्कस 2'मध्ये स्पर्धक म्हणून आणि स्टार गोल्डवर प्रसारित होणा-या 'सबसे फेव्हरेट कौन' शो होस्ट केला होता.
वयाच्या 18व्या वर्षी चित्राशाने कोमलची भूमिका साकारली होती. तिला या सिनेमानंतर 'हरियाणवी टॉम बॉय' म्हणून ओळखले जाऊ लागले. या 8 वर्षांत तिच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह चित्राशी टि्वटर आणि इंस्टाग्रामवर स्वत: ग्लॅमरस छायाचित्रे शेअर करत असते.
2007पासून आतापर्यंत किती बदलली चित्राशी रावत, पाहा पुढील स्लाइड्सवर क्लिक करून...
बातम्या आणखी आहेत...