मुंबईः लग्नाच्या अवघ्या वर्षभरात सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाल्याची बातमी समोर आली आहे. सोहा आणि कुणालच्या मध्ये एखाद्या दुस-या व्यक्तीची एन्ट्री झालेली नाही. तर बाळावरुन या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
काय आहे प्रकरण...
- Spotboye.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कुणाल (32) ची इच्छा आहे, की सोहाने (37) लवकरात लवकर आई व्हावे.
- मात्र आई होण्यापूर्वी काही सिनेमे करण्याची कविताची इच्छा आहे. त्यामुळे तिला लवकर मूल नकोय.
- सोहाने कुणालचा यावरुन बरीच समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणाल काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद वाढले.
- कुटुंब लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी कुणालची इच्छा आहे.
दोन वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर केले होते लग्न...
- गेल्यावर्षी 25 जानेवारी रोजी सोहा अली खान आणि कुणाल लग्नगाठीत अडकले.
- लग्नापूर्वी हे दोघे दोन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.
- 2009 मध्ये 'ढुंढते रह जाओगे'च्या सेटवर दोघांची भेट झाली होती.
- तीन वर्षे डेटिंग आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर जानेवारी 2015 मध्ये दोघांनी लग्न केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सोहा आणि कुणालची निवडक छायाचित्रे...