आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते \'लाल दुप्पटेवाली..\' गर्ल, नवीन फोटोशूटमध्ये दिसला ग्लॅमरस अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डायरेक्टर डेव्हिड धवन यांच्या आँखे (1993) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री रितू शिवपुरी एक पॉप्युलर मॅगझीनची कव्हर गर्ल बनली आहे. कव्हरवर ऑरेंज कलर गाउनमध्ये रितू सिझलिंग दिसत आहे. या फोटोशूटमध्ये रितू दोन वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसत आहे.

लाल दुपट्टा गाण्यामुळे आली चर्चेत..
ओम शिवपुरी आणि सुद्धा शिवपुरीची मुलगी रितूने वयाच्या केवळ 17 व्या वर्षी डेब्यू केले होते. गोविंदासोबत आँखे सिनेमातील गाणे 'ओ लाल दुपट्टे वाली...' मधून रितू चर्चेत आली. रितुने आर या पार (1997), हद कर दी आपने (2000), लज्जा (2001), शक्ति: द पावर (2002) यासारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.

टीव्ही शोमधून पुनरागमन...
बॉलिवूडमध्ये खास खास स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या बॉलिवूडशी काहीही संबंध नसलेल्या हरी व्यंकट यांच्यासोबत लग्न केले होते. अनेक वर्ष बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर रितू अनिल कपूरच्या टीव्ही शो 24 सीजन-2 मध्ये डॉक्टरच्या भूमिकेत दिसली. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या रितूला इंस्टाग्रामवर साडेतीन लाखापेक्षा जास्त लोक फॉलो करतात. इंस्टग्रामवर रितू विविध ग्लॅमरस आणि फॅमिली फोटो शेअर करत असते.

पुढील स्लाईड्सवर पाहा, रितू शिवपुरीचे LATEST PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...