आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअरची 20 वर्षे पूर्ण करणाऱ्या ऐश्वर्याची दक्षिण आफ्रिकेतही होती Craze

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण सध्या जगभरातील एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये भारताचा डंका वाजवत असल्या तरी ग्लॅमरस जगात भारताला ओळख मिळवून देण्याचे श्रेय जाते ते ऐश्वर्या रायला. ऐश्वर्याने नुकतेच सिने इंडस्ट्रीच्या कारकिर्दीची 20 वर्षे पूर्ण केली आहेत. मिस वर्ल्डचा किताब जिंकणे असो, हॉलीवूडच्या चित्रपटात भूमिका असो किंवा कान्स सारख्या महोत्सवांतील हजेरी असो. ऐश्वर्या ही सुमारे एका दशकापेक्षा जास्त काळ भारताचा चेहरा होती.  

पण हॉलीवूडमध्ये डेब्यू करण्याआधी ऐश्वर्या दक्षिण आफ्रिकेतील टीव्ही स्क्रीनवर झळकत होती हे सांगितले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण ते खरे आहे. एवढेच नाही तर तिच्याबरोबर टिव्ही स्क्रीन शेअर करत होती आपली मराठमोठी सोनाली बेंद्रे. हो पण आम्ही एखाद्या सिनेमा किंवा मालिकेविषयी नव्हे तर जाहिरातीविषयी बोलत आहोत. राधा नावाच्या कपड्याच्या ब्रँडची ही जाहिरात होती. भारतीय पारंपरिक वेशभुषेमध्ये नटलेल्या म्हणजेच साडी परिधान केलेली ऐश्वर्या आणि सोनाली यांचा खास इंडियन लूक आपल्याला यात पाहायला मिळतो. मुंबईत मुख्यालय आणि दक्षिण आफ्रिकेत शाखा असलेल्या या ब्रँडसाठी तयार केलेली जाहिरात खास आफ्रिकेसाठी त्याठिकाणच्या भाषेचा लेहजा लक्षात घेऊन डब करण्यात आली होती.
गेल्या आठवड्यात एका फेसबूकपेजवर पब्लिश झाल्यानंतर या जाहिरातीने 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा दिला आहे. ऐश्वर्या आणि सोनालीचेही तारुण्यातील सौंदर्य या जाहिरातीतून पाहायला मिळते. आजही ही जाहिरात पाहून या ब्रँडचे कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ शकेल. चला तर मग आपणही पाहुयात ही जाहिरात. पण ते कपडे आता मिळतीलच हे मात्र नक्की नाही. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या जाहिरातीमधील ऐश्वर्या आणि सोनालीचा 90 च्या दशकातील घायाळ करणारा लूक..अखेरच्या स्लाइडवर पाहा जाहिरातीचा व्हिडीओ...
बातम्या आणखी आहेत...