आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • OMG! Deepika Padukone Mobbed By A Crazy Male Fan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : सेल्फी काढण्यासाठी मागे लागला क्रेझी फॅन, दीपिकाला जोडावे लागले हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपिका पदुकोण आणि तिच्यासमोर तिचा क्रेझी फॅन)
मुंबईः अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या मागे एक अज्ञात व्यक्ती पडली होती. ही व्यक्ती तिचा फॅन असल्याचे समजते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका पदुकोण मुंबईत आयोजित 'दिल धडकने दो'च्या स्क्रिनिंगला पोहोचली होती. येथून बाहेर पडत असताना एका व्यक्तीने तिचा पाठलाग करणे सुरु केले. दीपिकासोबत सेल्फी काढण्याची त्याची इच्छा होती. मात्र त्यावेळी दीपिका मुळीच फोटो काढण्याच्या मूडमध्ये नव्हती. मात्र तिचा हा क्रेझी फॅन काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता.
परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच तेथे हजर असलेल्या गार्ड्सनी त्याला तेथून दूर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. अखेर दीपिकाने हात जोडून त्याला तेथून जाण्यास सांगितले. पण ऐकेल तो दीपिकाचा चाहता कुठला. सरतेशेवटी दीपिकाला आपल्या चाहत्यासोबत सेल्फी काढावाच लागला. दीपिकाने सेल्फी काढून आपल्या या क्रेझी चाहत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पुढे पाहा, आपल्या या चाहत्यासोबत सेल्फी काढून घेताना दीपिका..