आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OMG: Viral Video Against Deepika Padukone My Choice

दीपिका पादुकोणच्या \'माय चॉइस\'च्या विरोधात नवा VIDEO झाला व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पादुकोण हिचा महिला सबलीकरणाविषयीचा 'MY CHOICE' हा व्हिडिओ नुकताच समोर आला होता. त्यानंतर या व्हिडिओ बरीच चर्चा झाली. अनेकांनी त्याबाबत मते मांडली. आता या व्हिडिओच्या विरोधात एक शॉर्ट फिल्म समोर आली आहे. अॅक्टर वरुण पृथी याने हा व्हिडिओ तयार केला आहे. सोशल मिडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे. यूट्यूबवर हा व्हिडिओ A Wife made a Choice to have Sex outside Marriage - My Choice नावाने अपलोड करण्यात आला आहे.

या शॉर्ट फिल्ममध्ये एक अशी महिला दाखवण्यात आली आहे, जिला तिच्याच अटींवर जीवन जगायचे आहे. त्यामुळेच ती विवाह झालेला असूनही इतर पुरुषांशी संबंध प्रस्थापित करते. पण अखेर तिला तिच्या CHOICE चा पश्चाताप होतो. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

व्हिडिओच्या अखेरीस म्हटले आहे की, येथे पुरुषाला त्याचा आणि महिलेचाही अंत करता आला असता. पण आपल्या अटींऐवजी त्याने योग्य तो निर्णय घेतला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतून एक सोशल मॅसेजही देण्यात येत आहे. सबलीकरण स्वार्थी झाल्याने नव्हे तर स्वच्छ मनाने होते. तुम्ही इतरांचा सन्मान कराल तर तुम्हालाही सन्मान मिळेल, असे त्यात म्हटले आहे.

कोण आहे, वरुण पृथी
वरुण पृथी अॅक्टर, डायरेक्टर आणि प्रोड्युसर म्हणून बॉलीवूडमध्ये सक्रिय आङे. तो प्रामुख्याने शॉर्ट फिल्म तयार करतो. तसेच अभिनय करतो. विविध मुद्यांवर शॉर्ट फिल्म तयार केलेल्या वरुणचे यू ट्यूब चॅनलवर 2 लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. तसेच फेसबूकवर 6 लाख 58 फॉलोअर्स आहेत. शुगरव्हील्स या चित्रपटांसाठी त्यांना एओएफ इटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आऊटस्टँडिंग कास्ट परफॉर्मंस अवॉर्ड मिळाला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, याच्याशी संबंधित काही PHOTOS आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO