आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On location: काश्मिरमध्ये कडाक्याच्या थंडीत झाले \'बजरंगी भाईजान\'चे शूटिंग, पाहा छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडे - (वर) दिग्दर्शक कबीर खानसोबत सलमान खान, (खाली) करीना कपूरसोबत सलमान, उजवीकडे - शूटिंग सेटवर सलमान)
मुंबईः बॉलिवूड स्टार सलमान खानच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून त्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. भारत-पाकिस्तान नातेसंबंधांवर आधारित हा सिनेमा आजच पाकिस्तानातही रिलीज करण्यात आला आहे. मात्र त्यासाठी सिनेमातील काही दृश्ये वळगण्यात आली आहे.
सिनेमात सलमानने पवनकुमार चतुर्वेदी हे पात्र साकारले असून तो बजरंगबलीचा मोठा भक्त असतो. एक पाकिस्तानी चिमुकली चुकून भारतात दाखल होते. तिची भेट या पवन चतुर्वेदीसोबत होते. तो या चिमुकलीला अर्थातच मुन्नीला तिच्या घरी घेऊन पाकिस्तानात घेऊन जाण्याचा निर्णय घेतो. तिला पाकिस्तान घेऊन जाताना त्याला येणा-या अडचणी या सिनेमात बघायला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेत्री करीना कपूर खानने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून रसिका हे तिच्या पात्राचे नाव आहे. याशिवाय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात पाकिस्तानी रिपोर्टरच्या भूमिकेत आहे. हा रिपोर्टर पाकिस्तानात पवन चतुर्वेदीची मदत करतो.
या सिनेमाच्या ब-याच भागाचे शूटिंग हे काश्मिरमध्ये झाले आहे. काश्मिरचे सौंदर्य या सिनेमात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कडाक्याच्या थंडीत सिनेमातील स्टारकास्टने येथे शूटिंग केले. काश्मिरसोबतच दिल्ली, कर्जत आणि मुंबई येथेही सिनेमाचे शूटिंग करण्यात आले आहे.
या सिनेमाकडून सलमानला ब-याच अपेक्षा आहेत. सलमान खान आणि रॉकलाइन व्यंकटेश यांनी संयुक्तरित्या या सिनेमाची निर्मिती केली आहे. कबीर खान यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रिलीजपूर्वीच या सिनेमातील 'सेल्फी ले ले रे' हे गाणे बरेच हिट झाले आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो का, हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बजरंगी भाईजान'ची ऑन लोकेशन छायाचित्रे...