Home »Gossip» On Location Photos Of Baahubali The Beginning

‘बाहुबली’च्या शूटिंगवेळी असा होता प्रभास, तमन्ना आणि इतर स्टार्सचा अंदाज, बघा PICS

दिव्य मराठी वेब टीम | Mar 17, 2017, 12:16 PM IST

एन्टरटेन्मेंट डेस्क: 'बाहुबली' या सिनेमाचा दुसरा भाग 'बाहुबली 2' (बाहुबली : द कन्क्लूजन) हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असून 16 मार्च रोजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एस.एस. राजामौली दिग्दर्शित या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रभास, राणा दग्गुबती आणि अनुष्का शेट्टी यांचा अॅक्शन अवतार बघायला मिळाला. याशिवाय ट्रेलरमध्ये देवसेना (अनुष्का शेट्टी) आणि अमरेंद्र बाहुबली (प्रभास) यांच्या लव्ह स्टोरीची झलकसुद्धा दिसली. हा सिनेमा येत्या 28 एप्रिल रोजी रिलीज होतोय.
10 जुलै 2015ला रिलीज झालेल्या 'बाहुबली' या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. 120 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या बाहुबली या फुलऑन एंटरटेन्मेंट सिनेमाने जवळपास 600 कोटींचा गल्ला जमवला होता.

असे आहेत पहिल्या भागाचे ऑनलोकेशन फोटोज..
'बाहुबली' या सिनेमाच्या पहिल्या भागाचे काही Behind-The-Scenes फोटोज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून दाखवत आहोत. या फोटोजमध्ये प्रभास (शिवुडू/बाहुबली), तमन्ना भाटिया (अवंतिका), राणा दग्गुबती (भलाल देव), देवसेना (अनुष्का शेट्टी), सथ्यराज (कट्टपा) सह इतर स्टार्स सिनेमाच्या सेटवर प्रॅक्टिस, स्टंट्स आणि क्वॉलिटी वेळ घालवताना दिसत आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बाहुबली'चे Behind-The-Scenes...

Next Article

Recommended