आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location: \'दिल धडकने दो\'च्या चित्रिकरणाचा आनंद घेताना स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( प्रियंका चोप्रा(डावीकडून), प्रियंका-अनुष्‍का, रणवीर सिंह)

मुंबई - झोया अख्‍तर आपला आगामी चित्रपट ' दिल धडकने दो' यामुळे चर्चेत आल्या आहे. या चित्रपटाचा गेल्या आठवड्यात ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तो आतापर्यंत 34 लाख लोकांनी पाहिला आहे. नुकतेच चित्रटाचे शीर्षक गीतही प्रदर्शित करण्‍यात आले असून ते 5 लाख लोकांनी ऐकले. या गीतास प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्‍तर या दोघांनी दिला.

बिखरी मेहरा कुटूंबावर आ‍धारित चित्रपटाचे चित्रिकरण मे 2014 मध्‍ये सुरु झाले होते. ते फ्रान्स, स्पेन आणि इटलीत चित्रित करण्‍यात आले. अनिल कपूर, शेफाली शह, रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा, अनुष्‍का शर्मा आणि फरहान अख्‍तर या कलाकारांची भूमिका दिल धडकने दो या चित्रपटात अभिनय करताना दिसतील. हा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
divyamarathi.com तुम्हाला चित्रपट चित्रिकरण दरम्यानची काही छायाचित्रे दाखवणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा दिल धडकने दो चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यानची छायाचित्रे...