आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

14 Rare Photos: 'शोले'च्या सेटवर असे एन्जॉय करायचे जय-वीरु, बसंती आणि गब्बर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः भारतीय चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय ठरलेला बॉलिवूडचा हिट सिनेमा म्हणजे शोले. या सिनेमाच्या रिलीजला 15 ऑगस्ट रोजी 41 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 ऑगस्ट 1975 रोजी सिनेमा थिएटरमध्ये झळकला. रमेश सिप्पी दिग्दर्शित हा सिनेमा अडीच वर्षांत तयार झाला होता. बंगळूरुजवळील रामनगर येथे रामगडचा सेट उभा करण्यात आला होता. आज या भागाला रामगड या नावानेच ओळखले जाते. शूटिंगवेळचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, हेमामालिनी यांच्यासोबत अधिकाधिक रिटेक करण्याची संधी मिळावी यासाठी धर्मेंद्र स्पॉट बॉईंजना पैसे देऊन सीन खराब करायला सांगत होते.

याशिवाय सिनेमात एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणून झळलेले गब्बर सिंह (अमजद खान) आणि ठाकूर बलदेव सिंह (संजीव कुमार) सेटवर घनिष्ठ मित्रांप्रमाणे एकत्र वेळ घालवत होते. शोलेच्या ऑन लोकेशन सेटवरील अशी अनेक छायाचित्रे आहेत, ज्यामध्ये कलाकारांमधील स्ट्राँग बाँडिंग बघायला मिळते.

Divyamarathi.com खास आपल्या वाचकांना 'शोले'च्या शूटिंगची खास छायाचित्रे घेऊन आले आहे. ही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...