आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Actresses Who Came To India To Find Their Free Spirit!

पडद्यावर बिनधास्तपणे इंटीमेट होतात या पाकिस्तानी अॅक्ट्रेसेस, मात्र या अभिनेत्रीने दिलाय नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा, उजवीकडे - वर अभिनेत्री मीरा आणि खाली सारा लॉरेन इंटीमेट सीन्स देताना... - Divya Marathi
डावीकडे - पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा, उजवीकडे - वर अभिनेत्री मीरा आणि खाली सारा लॉरेन इंटीमेट सीन्स देताना...

मुंबई - अभिनेता शाहरुख खानच्या \'रईस\' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाविषयी अनेक बातम्या झळकल्या आहेत. या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान काम करीत आहे ही बातमी तर आहेच पण तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत प्रणय सीन्स करण्यास नकार दिला आहे, ही मोठी बातमी आहे.
 
या सिनेमात ती नवाजुद्दीनची प्रेयसी दाखवण्यात येणार आहे. यात नवाजुद्दीन एक बेदरकार रांगड्या तरुणाची भूमिका साकारतो आहे. त्या दोघातील संबंध दाखवण्यासाठी एक प्रणय दृष्य चित्रीत करायचे होते. त्यात नवाजुद्दीन तिच्यावर बळजबरी करतो असा सीन होता तो करण्यास माहिराने नकार दिला आहे.
 
माहिरा ही पाकिस्तानातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत पाक फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी बॉलिवू़ड इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. मात्र त्यापैकी कुणी इंटीमेट सीन्स करण्यास नकार दिला, अशी बातमी कधी आली नाही. माहिरा मात्र त्याला अपवाद ठरली आहे. 
 
एक नजर टाकुया, अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणा-या कोणकोणत्या पाकिस्तानी अभिनेत्रींनी पडद्यावर इंटीमेट सीन्स दिले यावर...