आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत श्वेता तिवारीची ग्लॅमरस कन्या, लवकरच या अॅक्टरसोबत घेणारेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार असून तिची काही सिनेमा निर्मात्यांशी बोलणी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती ‘क्विकी’ नावाच्या सिनेमातून अभिनेता दर्शील सफारीबरोबर दिसण्याची शक्यता आहे. स्वतः श्वेताने पलक बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार असल्याचे सांगितले.

काय म्हणाली श्वेता... 
पलकच्या सिनेसृष्टीतील पदार्पणाविषयी श्वेता म्हणाली, ‘होय, पलक बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे आणि दर्शीलबरोबरच्या सिनेमासाठीही तिची बोलणी सुरू आहेत. सगळं निश्चित झाल्यावर अधिकृत बातमी जाहीर करूच.’ 

श्वेता आणि राजा चौधरीची मुलगी आहे पलक... 
पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. 2007 साली श्वेता आणि राजा चौधरीचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर पलकची संपूर्ण जबाबदारी श्वेताने स्वीकारली. त्यानंतर श्वेताने दुसरा विवाह केला. अभिनय हे तिच्या दुस-या नव-याचे नाव आहे. अभिनय आणि श्वेताला एक मुलगा आहे.  'कसौटी जिंदगी की', 'झलक दिखला जा' आणि 'बिग बॉस' या टीव्ही शोसाठी श्वेता प्रसिद्ध आहे. 

आईच्या पावलावर पलकचे पाऊल...  
श्वेता तिवारी हिच्या बोल्डनेसची चर्चा नेहमीच रंगत असते. पलकनेसुद्धा आता तिच्या पावलावर पाऊल टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच पलकने एक फोटोशूट केले असून त्यातील काही फोटोज इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये पलक खूपच सुंदर दिसत असून, तिचा लूक बघण्यासारखा आहे. वेगवेगळ्या अ‍ॅँगलने केलेल्या या फोटोशूटमध्ये पलकच्या अदा तिची आई श्वेतासारख्याच आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये.  

पुढील 10 स्लाईड्सवर बघा, श्वेताची लाडकी लेक पलकचा ग्लॅमरस लूक...  
बातम्या आणखी आहेत...