आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Papa Kehte Hai Fame Actress Mayoori Kango How Looks Now

औरंगाबादच्या या अॅक्ट्रेसचे वडील झगडतात मोलकरणींच्या हक्कासाठी, आता कुठे आहे ही प्रीटी गर्ल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री मयुरी कांगो वडील आणि मुलासोबत. - Divya Marathi
अभिनेत्री मयुरी कांगो वडील आणि मुलासोबत.
एन्टरटेन्मेंट डेस्कः ''घर से निकलते ही... कुछ दूर चलतेही रास्ते में है उसका घर...'' हे गाजलेले गाणे नक्कीच तुमच्या लक्षात असेल नाही का... या गाण्यात अभिनेता जुगल हसंराज त्याच्या प्रेयसीसाठी हे गाणे गात असतो. 'पापा कहते हैं' या सिनेमातील हे गीत आणि जुगल जिच्यासाठी हे गाणे गातो त्या अभिनेत्रीचे नाव आहे मयुरी कांगो... प्रीटी गर्ल मयुरीने आता बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. आता मयुरी कुठे आहे, सध्या काय करतेय, याची माहिती आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून करुन देतोय...
मुळची औरंगाबाद (महाराष्ट्र)ची आहे मयुरी...
मयुरी मुळची औरंगाबादची असून तिच्या वडिलांचे नाव डॉ. भालचंद्र कांगो तर आईचे नाव सुजाता कांगो आहे. भालचंद्र कांगो हे कम्युनिस्ट नेते असून सुजाता कांगो या रंगभूमीवर कार्यरत आहेत. मयुरीचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबादेतच झाले. सेंट फ्रान्सिस स्कूलमधून शालेय तर देवगिरी कॉलेजमधून मयुरीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. मयुरीला अभिनयाचे बाळकडू तिच्या आईकडूनच मिळाले आहे.
दहाव्या वर्गात असताना मिळाला होता बॉलिवूडमध्ये ब्रेक
मयुरी दहाव्या वर्गात असताना तिला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला होता. मुंबईत दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी नसीब (१९९५) या सिनेमासाठी मयुरीला विचारणा केली होती. मात्र दहावी असल्याने तिने सुरुवातीला ही ऑफर नाकारली. मात्र चर्चेनंतर तिने हा सिनेमा स्वीकारला. या सिनेमातील मयुरीचा अभिनय बघून महेश भट इम्प्रेस झाले आणि त्यांनी तिला पापा कहते है या सिनेमात लीड रोल दिला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गाजला होता. त्यानंतर मयुरी बेताबी (१९९७), होगी प्यार की जीत (१९९९) आणि बादल (२०००) या निवडक सिनेमांमध्ये झळकली. काही सिनेमांमध्ये मयुरीने आयटम साँगही केले.
२००१ साली वळली छोट्या पडद्याकडे
मोठ्या पडद्यावर निवडक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर मयुरीने आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला. डॉलर बहू, थोडा गम थोडी खुशी, क्या हादसा क्या हकीकत या टीव्ही शोजमध्ये ती झळकली. करिश्मा- द मिरॅकल ऑफ डेस्टिनी या मालिकेत मयुरीना करिश्मा कपूरच्या मुलीची भूमिका साकारली होती.
२००३ मध्ये थाटले लग्न...
मयुरीचे लग्न एनआरआय बिझनेसमन आदित्य ढिल्लनसोबत झाले आहे. २८ डिसेंबर २००३ रोजी औरंगाबाद येथे मयुरीचे लग्न झाले. लग्नानंतर मयुरी न्यूयॉर्कला स्थायिक झाली आणि तिने अभिनयाला रामराम ठोकला. न्यूयॉर्कमध्ये असताना मयुरीने तेथील विद्यापीठातून मार्केटिंग अँड फायनान्स या विषयात एमबीएची पदवी प्राप्त केली.
आता गुडगांवमध्ये आहे वास्तव्याला
आता मयुरी आपल्या कुटुंबासोबत गुडगांव येथे वास्तव्याला असून झेन्थ ऑप्टीमीडिया कंपनीत चीफ अॅनलॉग टू डिजिटल कनव्हर्शन ऑफिसर म्हणून काम करते.
पाच वर्षांच्या मुलाची आहे आई
मयुरीला एक मुलगा असून कियान हे त्याचे नाव आहे. कियान आता पाच वर्षांचा झाला आहे. मयुरीच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिची आपल्या कुटुंबीयांसोबतची अनेक छायाचित्रे बघायला मिळतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, मयुरीची ही खास छायाचित्रे...