आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या फिल्ममधल्या न्यूड सीनमुळे मराठमोळी राधिका आहे चर्चेत, रिलीज झाला त्याचा Trailer

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः बॉलिवूड अॅक्ट्रेस राधिका आपटे आणि आदिल हुसैन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'पार्च्ड' सिनेमा त्यातील बोल्ड सीन्समुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. येत्या 23 सप्टेंबर रोजी हा सिनेमा भारतात रिलीज होतोय. या सिनेमाचा नवीन ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. राधिका आणि आदिल हुसैन यांच्यासह सुरवीन चावला आणि तनिष्ठा चॅटर्जी यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. अभिनेता अजय देवगण या सिनेमाच सहनिर्माता आहे.
या सिनेमात एका खेडे गावातील तीन महिलांच्या संघर्षाची कहानी दाखवण्यात आली आहे. महिला गावातील परंपरा तोडण्यासाठी कशा झटतात, ते या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. भारतातील महिलांच्या समस्यांवर या सिनेमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. अनेक देशांत आतापर्यंत हा सिनेमा रिलीज झाला असून विविध 18 पुरस्कार या सिनेमाने पटकावले आहेत.
पॉर्नच्या नावावर विक्री होताहेत सिनेमाच्या डीव्हीडी...

राधिका आपटे आणि आदिल हुसैन यांनी या सिनेमात न्यूड सीन दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच तो सीन इंटरनेटवर व्हायरल झाला होता. या सिनेमाला पोर्न फिल्म सांगत सिनेमाच्या डीव्हीडी कोलकत्यात विकल्या जात असल्याची माहिती समोर आली होती. सिने निर्मात्यांची याची माहिती सायबर सेलला दिली आहे. पण अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.
पुढील स्लाईडमध्ये बघा, नुकताच रिलीज झालेला सिनेमा ट्रेलर आणि त्यापुढील स्लाईड्समध्ये सिनेमाची खास झलक छायाचित्रांमधून...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...