आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'परदेस'ने पूर्ण केली 18 वर्षे, जाणून घ्या आता कुठे आहे सिनेमातील लीड अॅक्ट्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी आर्यनासोबत अभिनेत्री महिमा चौधरी - Divya Marathi
मुलगी आर्यनासोबत अभिनेत्री महिमा चौधरी

मुंबईः सुभाष घई दिग्दर्शित 'परदेस' या सिनेमाच्या रिलीजला आज 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. 8 ऑगस्ट 1997 रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला होता. शाहरुख खान, महिमा चौधरी, अमरिश पुरी, अपूर्व अग्निहोत्री आणि आलोकनाथ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात होत्या. अभिनेत्री महिमा चौधरीने या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. महिमा चौधरीचे खरे नाव ऋतू चौधरी आहे. मात्र सुभाष घई यांनी तिला महिमा या नावाने सिनेसृष्टीत लाँच केले.
'परदेस' या सिनेमानंतर 'दाग : द फायर' (1999), 'लज्जा' (2001), 'धडकन' (2000), 'बागबान' (2003) आणि 'सँडविच' (2006) या सिनेमांमध्ये महिमा झळकली. मात्र आजही तिला परदेस गर्ल म्हणून ओळखले जाते.
2006 मध्ये लग्न, मात्र आता नव-यापासून विभक्त
महिमा चौधरी ब-याच काळापासून लाइमलाइटपासून दूर असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 2006 मध्ये तिने व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. मात्र आता ती आपल्या नव-यापासून विभक्त झाली आहे. तिला आठ वर्षांची एक मुलगी असून तिचे नाव आर्यना आहे. महिमा सध्या 'मुम्भाई : द गँगस्टर' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यामध्ये ती गँगस्टरच्या भूमिकेत झळकणारेय. याशिवाय 'सिमरन', 'चेस : द गेम प्लान' आणि 'दरबार' हे तीन सिनेमे तिचे पाइपलानमध्ये असून पुढील दोन वर्षांत रिलीज होणार आहेत.
सिनेमांत येण्यापूर्वी जाहिरातींमध्ये केले काम...
१३ सप्टेंबर 1973 रोजी पश्चिम बंगाल येथील दार्जिलिंगमध्ये जन्मलेल्या महिमाने 90 च्या दशकाच्या सुरुवातील जाहिरातींमध्ये काम केले होते. आमिर खान आणि ऐश्वर्या राय बच्चनसोबतची तिची पेप्सीची जाहिरात विशेष लोकप्रिय झाली होती. याशिवाय टीव्ही चॅनलवर व्हीजे म्हणून तिने काम केले आहे. याचकाळात सुभाष घईंची नजर तिच्यावर पडली आणि तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, लग्नानंतरची महिमा चौधरीची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...