आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Parineeti Chopra Just Bought 2 Shirts For 1 Million

परिणीतीने 10 लाखांत खरेदी केले 2 शर्ट, 40 लाखांचे घेतले लंच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(\'बिलिंग\' काउंटरवर परिणीती चोप्रा)
 
स्वत:ला नवीन लूकमध्ये समोर आणल्यानंतर परिणीती चोप्रा आता मनसोक्त फिरत आहे. ती आता इंडोनेशियामध्ये पोहोचली आहे. जर्कातामध्ये तिने एका मॉलमध्ये शॉपिंग केली. रंजक गोष्ट म्हणजे, तिने येथून 10 लाखांचे दोन शर्ट खरेदी केले आहे. याविषयी सांगताना परिणीतीने टि्वटरवर माहिती दिली. तिने टि्वट केले, \'I paid 1 million for 2 shirts!!!! #CrazyCurrency #Jakarta.\'
 
या टि्वटसोबत तिने एक फोटोसुध्दा शेअर केला आहे. त्यामध्ये ती बिलिंग काउंटरवर उभी दिसतेय. 10 लाखांचे दोन शर्ट खरेदी केल्यानंतर तिने 40 लाखांचे लंच केले. टि्वट करून परिणीतीने लिहिले, \'Haha I love how everybody got their calculators out! 1 million for shirts, 4 million for lunch,the craziness goes on!!\'. 
 
इंडोनेशियाच्या करेन्सी रुपयाच्या तुलनेत भारतात रुपयांचे मुल्य जास्त आहे. भारताचा एक रुपया 214.82 इंडोनेशियाच्या रुपयांच्या बरोबरीने आहे. त्यामुळे जर्कातामध्ये परिने दोन शर्टसाठी 1,087,700 रुपये दिले, म्हणजे भारताच्या करेन्सीच्या हिशोबाने तिने 5,063 रुपये खर्च केले. 
 
परिणीती चोप्राने मागील काही माहिन्यापूर्वी स्वत:ला पूर्ण ट्रान्सफॉर्म केले आहे. तिने ऑस्ट्रियामध्ये डेटॉक्स प्रोग्राम अटेंड करून स्वत:ला कर्वीने फिट बनवले. कार्यक्रमांतर्गत तिने 10 किलो वजन कमी करण्यासाठी 10 लाख रुपये खर्च केले होते. फिट झाल्यानंतर तिने \'द ज्यूस मॅग्झिन\'साठी ग्लॅमरल फोटोशूट केले. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परिणीतीचा नवीन लूक...