आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणीतीचे बॉयफ्रेंडसोबत झाले Patch up, तासन् तास ऑफिसमध्ये घालवताय वेळ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीष शर्मा आणि परिणीती चोप्रा - Divya Marathi
मनीष शर्मा आणि परिणीती चोप्रा
मुंबई: काही दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या, की परिणीतीचा बॉयफ्रेंड दिग्दर्शक मनीष शर्मासोबत ब्रेकअप झाले आहे. मात्र नुकतेच समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, दोघांचे पॅचअप झाले आहे. बातम्या अशाही आहे, की दोघे पुन्हा एकमेकांना डेट करत आहेत. परिणीती आणि मनीष दोघे मागील चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 
 
मनीषच्या केबिनमध्ये दिसली परिणीती...
सूत्रांच्या सांगण्यानुसार, दोघांनी यशराज फिल्म्ससोबत एक प्रोजेक्ट साइन केला आहे. या सिनेमाचे टायटल आहे \'मेरी प्यारी बिंदु\'. सिनेमात परिणीतीचा को-स्टार आयुष्मान खुराणा आहे. अक्षय रॉय दिग्दर्शित हा सिनेमा मनीष शर्मा निर्मित करत आहे. बातम्यांनुसार, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. एकमेकांच्या घरी येणे-जाणेसुद्धा सुरु झाले आहे. इतकेच नव्हे तर परिणीती मनीषच्या कॅबिनमध्ये तासन् तास वेळ घालवताना दिसतेय. 
 
जेव्हा लग्नाच्या प्रश्नावर बोलली, \'नो...नो...\'
रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच कोलकात्यात \'मेरी प्यारी बिंदु\' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एका स्थानिक रिपोर्टरने परिणीतीला बंगाली भाषेत विचारले, \'तू ख-या आयुष्यात लग्न करणार आहेस.\' परिणीतीला हा प्रश्न कळाला नाही. तिचा को-स्टार आयुष्मानने तिला समजून सांगितल्यानंतर तिने लगेच उत्तर, \'नो...नो...\'
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परिणीती आणि मनीषचे काही फोटो...
 
बातम्या आणखी आहेत...