आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Past Life Of Bollywood Stars Like Nawazuddin Siddique, Sonam Kapoor And Many More

सिनेसृष्टीत येण्यापूर्वी नवाजुद्दीन होते चौकीदार, जाणून घ्या बॉलिवूडच्या 17 Celebsच्या संघर्षाविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार्सच्या संदर्भातील छोट्यातील छोटी गोष्ट मोठी बातमी होत असते. हे सेलिब्रिटी काय करतात त्यांच्या खासगी आयुष्यात कोणत्या घडामोडी घडतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी हे कलाकार नेमके काय करायचे हे ब-याच जणांना ठाऊक नाहीये. त्यामुळेच सेलिब्रिटींच्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायलाही चाहत्यांना नक्कीच आवडणार आहे. आज आम्ही तुम्हाला यशोशिखर गाठणारे बी टाऊनचे सेलिब्रिटी फिल्मी करिअरला सुरुवात करण्यापूर्वी कोणत्या क्षेत्रात काम करत होते, ते सांगत आहोत.
सुरुवात करुयात अल्पावधीतच आपल्या अभिनयाच्या बळावर यशोशिखरावर पोहोचलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीपासून...
अलीकडेच रिलीज झालेल्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले आहे. चाँद नवाबच्या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला. 'सरफरोश', 'ब्लॅक फ्रायडे', 'गँग्स ऑफ वासेपुर' यांसारख्या सिनेमांमध्ये झळकलेले नवाजुद्दीन सिद्दीकी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून वर आले आहेत. बेताची परिस्थिती असल्याने सायन्समध्ये ग्रॅज्युएट असलेल्या नवाजुद्दीन यांनी काही दिवस केमिस्टची नोकरी केली. मात्र अभिनयात रुची असल्याने ते दिल्लीत दाखल झाले. येथे उदरनिर्वाहासाठी त्यांनी रात्रपाळीत चौकीदारीची नोकरी केली आणि दिवसा ते एनएसडीत अभिनयाचे धडे गिरवू लागले. 1996 मध्ये त्यांनी एनएसडीमधले आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. मात्र हीरोसारखे रंगरुप नसल्याने त्यांना अनेक नकार पचवावे लागले. मात्र त्यांनी धीर सोडला नाही. 1999 मध्ये 'सरफरोश' या सिनेमात त्यांना एक छोटीशी भूमिका मिळाली आणि त्यांचे नशीब चमकले. या सिनेमातील भूमिका बघून अनुराग कश्यप यांनी त्यांना 'ब्लॅक फ्रायडे'साठी निवडले. आणि त्यानंतर त्यांना 'गँग्स ऑफ वासेपूर' हा सिनेमा मिळाला. त्यानंतर किकमध्ये त्यांनी वठवलेला व्हिलन सर्वांच्या पसंतीस पडला. 'बदलापूर'मध्येही त्यांना चांगली भूमिका मिळाली. 'किक' सिनेमातील अभिनय पाहून सलमान खानने त्यांना 'बजरंगी भाईजान' सिनेमाची ऑफर दिली. आता त्यांचा 'मांझी : द माउंटन मॅन' हा सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे.
नवाजुद्दीन यांच्याप्रमाणेच बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी यशोशिखरावर पोहोचण्यापूर्वी खूप संघर्ष केला आहे. अभिनयाकडे वळण्यापूर्वी रजनीकांत, अक्षय कुमार, सोनम कपूर, दिलीप कुमार, जॉनी लिव्हरसह बी टाऊनचे अनेक स्टार्स कोणते काम करत होते, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...