आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी मुंबईच्या रस्त्यांवर पेन विकायचे जॉनी लीव्हर, आज आहे 190 कोटीचे मालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडीयन आणि अभिनेता जॉनी लीव्हर यांनी आज वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 ऑगस्ट, 1957 साली आंध्र प्रदेशातील कनिगीरी येथे तेलुगु ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरातील बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही आणि शाळेत असतानाच त्यांनी शाळा सोडली. आंध्र प्रदेशात केवळ सातवीपर्यंत शिक्षण घेऊन जॉनी लीव्हर मुंबईत आले आणि त्यांनी रस्त्यावर पेन विकणे सुरु केले. ते रस्त्यांवर डान्स करत आणि बॉलिवूड सेलिब्रेटींची नकल करत पेन विकायचे. पण कधीकाळी हे काम करणाऱ्या जॉनी लीव्हर यांची संपत्ती आज जवळपास 190 कोटींच्या घरात आहे. जाणून घ्या, कसा होता जॉनी यांचा स्ट्रगलिंगचा काळ..
 
प्रखर इच्छाशक्ती असल्याने त्यांनी मिमिक्रिच्या बळावर नाव कमावले. याकामी त्यांची मदत मिमिक्री आर्टीस्ट प्रताप जैन आणि राम  कुमार यांनी केली. 
- जॉनी यांनी मुंबईत हिंदुस्तान लीव्हर कंपनीमध्ये काम केले होते. येथे काम करत असताना ते त्यांच्या कलीग्सना कॉमेडी करुन हसवत असत. हळूहळू ते इतर कर्मचाऱ्यांमध्येही प्रसिद्ध झाले आणि त्यांचे नाव पडले जॉनी लिव्हर.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, जॉनी लीव्हर यांना कसा मिळाला पहिला ब्रेक..
बातम्या आणखी आहेत...