आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजक FACTS : भाग्यश्री आहे राजकन्या, एका निर्णयाने \'चौपट\' झाले फिल्मी करिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्री आल्या त्यांनी रुपेरी पडद्यावर काही दिवसच काम केले परंतु आपल्या अभिनयाने त्यांनी लोकांना भूरळ घातली. बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीदेखील अशाच सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आज भाग्यश्रीचा 47वा वाढदिवस आहे. भाग्यश्रीचा जन्म 23 फेब्रुवारी 1969ला शाही पटवर्धन कुटुंबात झाला. तिचे पूर्ण नाव राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन आहे. सांगलीचे राजा श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन यांची ती मुलगी आहे. तिच्या आईचे नाव राजलक्ष्मी आहे. भाग्यश्रीला तीन बहीणी आहेत आणि त्यामध्ये ती सर्वात मोठी आहे.
भाग्यश्रीचे कुटुंब पारंपरिक विचारांचे होते. म्हणून तिला घराबाहेर जास्त वेळ फिरण्याची मुभा नव्हती. कॉलेजच्या दिवसांत संध्याकाळ होण्यापूर्वीच घरात परत यायला हवे, असा तिच्या घरातील नियम होता. बॉलिवूडमध्ये काम करणे सोडल्यानंतर भाग्यश्री आता कुटुंबामध्ये व्यस्त आहे आणि तिच्या पतीला मीडिया कंपनी चावलण्यासाठी हातभार लावते.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत भाग्यश्रीविषयीच्या आयुष्यातील काही अशा रंजक गोष्टी ज्या कदाचितच कुणाला माहित असतील. भाग्यश्रीविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...