आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personal Life Photos Of Newly Married Actress Minissha Lamba

जाहिराती करताना मिळाला होता सिनेमा, जाणून घ्या Newly Married अॅक्ट्रेस मिनिषाविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- मिनिषा लांबा रॅपर स्नूप डॉगसोबत)
मुंबई- 'बिग बॉस 8'ची माजी स्पर्धक आणि बॉलिवू़ड अभिनेत्री मिनिषा लांबाने बॉयफ्रेंड रिआनसोबत लग्न केले आहे. मिनिषा आणि रिआनची भेट 2013मध्ये एक कॉमन फ्रेंडचव्दारे झाली होती. बातम्यांनुसार, दोघे पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोन वर्षांच्या नात्यानंतर दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. जाणून घेऊया मिनिषा लांबाच्या खासगी आयुष्याबद्दल...
मिनीषा एका हरियाणवी कुटुंबातली आहे. तिचा जन्म 18 जानेवारी 1985 रोजी नवी दिल्लीमध्ये झाला. मिनिषाच्या वडिलांचे नाव केवल आणि आईचे मंजू आहे. तिला करण हा छोटा भाऊ आहे. मिनिषाने चेन्नईच्या चेत्तीनाद विद्याश्रम शाळेतून आणि दिल्लीच्या मिरांडा यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले.

शिक्षण घेताना केले मॉडेलिंग...
मिनिषा दिल्ली यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होती, त्यावेळीच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने सोनी, एलजी, कॅडबरी, एअरटेल आणि सनसिल्कसारख्या अनेक प्रसिध्द ब्रान्ड्ससाठी जाहिराती केल्या.
जाहिरात करताना मिळाला सिनेमा-
कॅडबरीची जाहिराच शूट करत असताना तिला दिग्दर्शक सुजीत सरकारने तिला आपल्या 'यहा' सिनेमासाठी ऑफर केले. हा सिनेमा 2005मध्ये रिलीज झाला होता. त्यासाठी मिनिषा फिल्मफेअर उत्कृष्ट फिमेल डेब्यू अवॉर्डसाठी नॉमिनेट झाले होते. विशेष म्हणजे, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ती मिरांडा यूनिव्हर्सिटीमध्ये पदवी शिक्षण घेत होते.
'बचना ए हसीनो'मधून मिळाली ओळख-
तसे पाहता, मिनिषाने 'यहा' सिनेमानंतर 'कॉर्पोरेट', 'अथोनी कौन है', 'हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'दस कहानिया'सारख्या सिनेमांत सहायक अभिनेत्री म्हणून काम केले. परंतु तिला 2008मध्ये रिलीज झालेल्या 'बचना ए हसीनो'मधून तिला ओळख मिळाली. या सिनेमात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण आणि बिपाशा बसुसुध्दा महत्वाचे पात्र साकारले होते. मिनिषाने सिनेमात माहीची भूमिका केली होती. तिचा आगामी 'हंगामे पे हंगामा' सिनेमा 2015मध्ये रिलीज होणार आहे.
या सिनेमांसाठी झाली प्रशंसा-
किडनॅप (2008)
वेल डन अब्बा (2010)
पंजाबी सिनेमांमध्येसुध्दा केले काम-
मिनिषाने हिंदीसोबत पंजाबी आणि कन्नडी सिनेमांतही काम केले आहे. पंजाबीमध्ये तिने 'हीरो और हीरो' (2013) आणि 'डबल दी ट्रबल' सिनेमांत काम केले. तसेच, 'कॉन्ट्रॅक्ट' (2011) हा तिचा कन्नडीमध्ये एकमेक सिनेमा आहे.
'बिग बॉस 8'मध्ये होती चर्चेत-
बिग बॉसमध्ये मिनिषा आर्य बब्बरमुळे चर्चेत आली होती. आर्य बब्बर विशेष योजना घेऊन शोमध्ये आला आहे, असे मिनिषाने म्हटले होते. मात्र, नंतर दोघांनी साम्यंजस्याने हे प्रकरण मिटवले आणि बाहेर आल्यानंतर मिनिषाने म्हटले होते, की तिला कोणाविषयी काहीच तक्रार नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मिनिषाच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे...