आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फूल आणि कांटे\'ची 24 वर्षे: काही स्टार्सचा बदलला लूक तर काहींनी घेतला जगाचा निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमातील अजय (अजय देवगण) आणि पूजा (मधु शाह)
मुंबई- अभिनेता अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 24 वर्षे पूर्ण झाले आहे. 22 नोव्हेंबर 1991ला त्याचा पहिला सिनेमा 'फूल और कांटे' रिलीज झाला होता. दिग्दर्शक कुकू कोहलीला या सिनेमात अजयने डॉन नागेश्वरच्या मुलाची भूमिका साकारली होती. तो आपल्या वडिलांच्या गोरखधंद्याच्या विरोधात असतो.
सिनेमात अजयशिवाय, मधु, अमरिश पूरी, सत्येन कप्पू (सत्येंद्र कपूर) आणि अरूणा ईरानीसुध्दा महत्वाच्या भूमिकेत होते. सिनेमा रिलीज होऊन 24 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या 24 वर्षांत सिनेमाच्या स्टारकास्टमध्येसुध्दा बराच बदल झाला आहे. इतकेच नव्हे तर काही स्टार्स आता या जगात नाहीत.
divyamarathi.com या पॅकेजच्या माध्यमातून 24 वर्षांत स्टारकास्टमध्ये झालेला बदल दाखवत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...