आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photo Of The Day: Genelia Show Off Her Baby Bump In Arpita\'s Baby Shower

Photo of the day: अर्पिताच्या बेबी शॉवरमध्ये पहिल्यांदाच बेबी बंप दाखवताना दिसली जेनेलिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांची कौल आणि अर्पिता खान-शर्मासोबत बेबी बंप दाखवताना जेनेलिया देशमुख - Divya Marathi
कांची कौल आणि अर्पिता खान-शर्मासोबत बेबी बंप दाखवताना जेनेलिया देशमुख

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया यांच्याकडे दुस-यांदा गोड बातमी आहे. अर्थातच जेनेलिया लवकरच आपल्या दुस-या बाळाला जन्म देणारेय. नुकतीच जेनेलिया, रितेश आणि मुलगा रिआनसोबत अर्पिता खान-शर्मा हिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये जेनेलिया नेहमीप्रमाणेच अगदी सुंदर दिसली.
सदैव हसतमुख दिसणारी जेनेलिया यावेळी पहिल्यांदाच बेबी बंप दाखवताना कॅमे-यात क्लिक झाली. नेहमी जेनेलिया कॅमे-यापासून आपले बेबी बंप लपवताना दिसायची. मात्र अर्पिताच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात जेनेलियाने अर्पिता आणि कांची कौलसोबत बेबी बंप दाखवले. टीव्ही अभिनेता शब्बीर अहलुवालियाची पत्नी कांची कौलसुद्धा लवकरच आई होणारेय.
अर्पिताने जेनेलिया आणि कांचीसोबतचे हा क्यूट फोटो शेअर करुन ट्विट केले, ''2 of the sweetest girlies I know,luv them @geneliad @KANCHIKAUL thnks 4 coming&celebrating our special day with us''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अर्पिताच्या डोहाळे जेवणात क्लिक झालेली जेनेलिया, रितेश आणि रिआनची खास छायाचित्रे...