आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टर नव्हे फोटोग्राफर होते बोमन इराणी, बघा त्यांनी क्लिक केलेले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मृती इराणी (उजवीकडे) सह मिस इंडिया 1998 स्पर्धेतील इतर स्पर्धकांचे हे छायाचित्र बोमन इराणी यांनी क्लिक केले होते. - Divya Marathi
स्मृती इराणी (उजवीकडे) सह मिस इंडिया 1998 स्पर्धेतील इतर स्पर्धकांचे हे छायाचित्र बोमन इराणी यांनी क्लिक केले होते.

मुंबईः बॉलिवूड अभिनेता बोमन इराणी यांनी वयाची 58 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 डिसेंबर 1959 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. बोमन यांना लोक एक सशक्त अभिनेत्याच्या रुपात ओळखतात. मात्र अभिनेता होण्यापूर्वी ते एक प्रोफेशनल फोटोग्राफर होते, हे फारच थोड्या लोकांना ठाऊक आहे. त्यांच्या उत्कृष्ट फोटोग्राफीमुळे त्यांना फेमिना मिस इंडिया पेजेंटमध्ये ज्युरी मेंबर म्हणून स्थान मिळाले होते.


एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, ''मिस इंडिया स्पर्धेसाठी मी डायना हेडन हिचे पोर्टफोलिओ तयार केले होते. त्यानंतर ती मिस वर्ल्ड बनली होती. मी 5 वेळा मिस इंडिया स्पर्धेसाठी शूट केले, त्यानंतर मला पेजेंटच्या ट्रेनिंग प्रोगाममध्ये सहभागी करुन घेण्यात आले आणि नंतर मी ज्युरीमध्येही सहभागी झालो.''


जन्मापूर्वीच हरपले होते वडिलांचे छत्र
बोमन यांनी आपल्या आपल्या खासगी आयुष्याविषयी सांगताना म्हटले होते, की त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. आईने एकट्याने त्यांचा सांभाळ केला. आपल्या संघर्षाविषयी ते सांगतात, ''दोन वर्षे मी मुंबईतील कोलाबास्थित ताज हॉटेलमध्ये वेटरचे काम केले होते.'' वयाच्या 21 व्या वर्षांपर्यंत ते वेटर होते. त्यानंतर त्यांनी आईला त्यांच्या फॅमिली बिझनेसमध्ये मदत करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे एक छोटे दुकान होते, जेथे त्यांचे वडील आलूचिप्स बनवायचे. त्याच दुकानात त्यांची भेट जेनोबियासोबत झाली, जी आज त्यांची पत्नी आहे. बोमन यांनी सांगितले, जेनोबिया त्यांची परमनंट ग्राहक होती. वयाच्या 25 व्या वर्षी मी तिच्यासोबत केले आणि लग्नाच्या पाच वर्षांनी फोटोग्राफीच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
स्पोर्ट्स इव्हेंटपासून केली फोटोग्राफीला सुरुवात


बोमन यांनी फोटोग्राफीची सुरुवात एका स्पोर्ट इव्हेंटपासून केली होती. याशिवाय एका वृत्तपत्रासाठी ते फ्रिलांसिंगदेखील करायचे. काही पैसे गोळा झाल्यानंतर त्यांनी एक लेन्स खरेदी केला आणि दोन महिने चेन्नईत ट्रेनिंग घेतले. तेथून मुंबईत परतल्यानतंर एका जाहिरात कंपनीसाठी त्यांनी काम सुरु केले. सुरुवातीला ते स्पोर्टी अॅड शूट करायचे. हळूहळू त्यांनी प्रसिद्ध चेह-यांना आपल्या कॅमे-यात कैद करायला सुरुवात केली. याच काळात त्यांना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धा शूट करण्याची संधी मिळाली होती.

 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बोमन इराणी यांच्या फोटोग्राफीची खास झलक...

 

फोटो साभार : bomanirani.com

बातम्या आणखी आहेत...